भंडारा : जिल्ह्यात 24 ते 31 डिसेंबर दरम्यान विशेष लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे. सध्यातरी कोरोनावर लस हाच एकमेव पर्याय आहे. विशेष लसीकरण मोहिमेच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी भंडारा तालुक्यातील बेला व शहापूर येथील लसीकरण केंद्राला भेट देवून पाहणी केली. उपविभागीय अधिकारी रविंद्र राठोड, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अभिषेक नामदास यावेळी उपस्थित होते.
लसीकरण प्रलंबित असलेल्या जास्तीत जास्त नागरिकांनी लसीकरण करुन घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले. तसेच लसीकरण प्रलंबित असलेल्या नागरिकांच्या घरोघरी जाऊन समुपदेशन करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले.