नांदेड जिल्ह्यातील काँग्रेस नेते मारोतराव कवळे गुरूजी यांचा भाजपामध्ये प्रवेश

– नांदेड जिल्ह्यात काँग्रेसला आणखी एक धक्का

नांदेड :- जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील नेते शंकरराव चव्हाण, सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन मारोतराव कवळे गुरुजी यांनी बुधवारी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांचे स्वागत केले. भारतीय जनता पार्टी प्रदेश कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमाला आमदार राजेश पवार, ज्येष्ठ नेते भाऊराव देशमुख, भाजपा प्रदेश सरचिटणीस संजय केनेकर, माजी आमदार अमर राजुरकर आदी उपस्थित होते. कवळे गुरुजी यांच्या भाजपा प्रवेशामुळे नांदेड जिल्ह्यात भाजपाला आणखी बळ मिळेल असे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी सांगितले. कवळे गुरुजी यांनी नायगाव विधानसभा मतदार संघात दुध डेअरी, गूळ उत्पादन,सहकारी पतसंस्था आणि सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून मोठे काम उभे केले आहे.

नांदेड जिल्ह्याच्या राजकारणात दीर्घ काळ काँग्रेसचे वर्चस्व राहिले आहे. काही दिवसांपूर्वीच माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. त्यापाठोपाठ नांदेड महापालिकेच्या 55 माजी नगरसेवकांसोबतच भोकर विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

सेमी कंडक्टरमुळे भारत ग्लोबल हब बनेल - प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा विश्वास

Wed Mar 13 , 2024
– प्रधानमंत्री यांच्या हस्ते देशातील तीन सेमी कंडक्टरच्या सुविधांचा पायाभरणी समारंभ  मुंबई :- माहिती तंत्रज्ञानाच्या युगात इलेक्ट्रॉनिक चिप खूप महत्वाचे ठरत आहे. भारताचे 1960पासूनचे स्वप्न आता पूर्ण होत असून भारताला सेमी कंडक्टरच्या माध्यमातून आत्मनिर्भर बनवून ग्लोबल हब बनविण्याचा विश्वास प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरदृश्य सवांद प्रणालीद्वारे गुजरातमधील दोन आणि आसामधील एका सेमी कंडक्टर […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
Verified by MonsterInsights