आरोग्य विभागातील रिक्त पदे लवकरच भरणार – सार्वजनिक आरोग्यमंत्री डॉ.तानाजी सावंत

मुंबई : राज्यातील आरोग्य सेवा – सुविधांच्या बळकटीकरणासाठी विभागातील रिक्त पदे लवकरच भरण्यात येतील. तसेच आरोग्य केंद्रातील बायोमेट्रिक हजेरी प्रणालीसाठी मुंबई, पुणे येथे मध्यवर्ती बायोमेट्रिक हजेरी पडताळणी यंत्रणा कार्यान्वित करण्यात येणार आहे, असे सार्वजनिक आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी विधानसभेत सांगितले.

पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्यात आरोग्य सेवा सुधारण्यासाठीच्या उपाययोजनांबाबत विधानसभा सदस्य सर्वश्री सुभाष थोपटे, राजेश टोपे, अनिल देशमुख, रवी राणा यांनी प्रश्न उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना ते बोलत होते.

आरोग्य मंत्री तानाजी सावंत म्हणाले, हृदयविकाराने झटका येऊन मृत्यू होण्याचे प्रमाण वाढत आहे. अशा रुग्णांना गोल्डन अवरमध्ये आरोग्य सेवा – सुविधा तातडीने उपलब्ध व्हाव्यात यासाठी ‘स्टेमी’ प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचेही आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी यावेळी सांगितले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

दहेली धरणाचे काम जलदगतीने पूर्ण करणार - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Sat Mar 4 , 2023
मुंबई : नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यातील दहेली धरणाचे काम जलदगतीने व्हावे, यासाठी प्राधान्य देण्यात येईल. या कामासाठी सुधारित प्रशासकीय मान्यता देऊन उर्वरित काम तातडीने पूर्ण करण्यात येतील, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. अक्कलकुवा तालुक्यातील दहेली धरणाचे काम अपूर्ण अवस्थेत असल्याबद्दल विधान परिषद सदस्य आमश्या पाडवी यांनी तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com