– आरोपीला तलवारीसह ताब्यात घेऊन कारवाई केली
कन्हान :- मोबाईल च्या फेसबुकवर हातात तलवारी सह फोटो अपलोड करून पोस्ट केल्याने पोलीसानी दुर्गा नगर, सुखदेव कॉलनी कांद्री येथील सागर शिव शरण सिंग यास गोंडेगाव कॉलोनी येथुन पकडुन त्यांचे विरूध्द अवैधरीत्या विनापरवाना धारदार तलवार बाळगल्याने त्यांचे विरूध्द कलम ४/२५ भा. ह. का. अन्वये गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात आली.
(दि.१०) डीसेंबर २०२४ ला पो.स्टे. कन्हान परिसरात कन्हान पोलीस गस्त करीत असता गोपनीय माहीत मिळाली की, सागर सिंग राजपुतच्या फेसबुक अकाऊंटवर सागर सिंगचा हातात तलवार घेऊन व्हिडिओ पोस्ट केल्याची माहिती मिळाल्याने स्टाप व पंचासह कांद्री येथे गेल्यावर सदर इसम सध्या गोंडेगा व कॉलोनी येथे असल्याचे कळल्याने सपोनि राहुल चव्हाण पोलीस कर्मचा-यासह खाजगी वाहनाने गोंडे गाव कॉलोनी जावुन सागर सिंग राजपुतच्या फेसबुक अकाऊंटवर सागर सिंगचा हातात तलवार घेऊन व्हिडिओ पोस्ट केल्याचे विचारून ती तलवार कुठे आहे असे विचारले. तेव्हा गोंडेगाव कॉलोनी च्या मागे एका एका झुडपातुन एकुण ३५ इंच लांबी,२९ इंच लांबी आणि ०१ इंच रुंदीची लोखंडी तलवार पंचा समक्ष जप्त करून कन्हान पोलीस स्टेशन ला आरोपी सागर शिवशरण सिंग वय २७ रा. दुर्गा नगर सुखदेव कॉलोनी कांद्री ता. पारशिवनी जिल्हा नागपुर यांचे विरूध्द कलम ४/२५ भा.द.वि. गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात आली.
सदर कारवाई कन्हान पोलीस स्टेशन चे पोलीस निरिक्षक राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनात स.पो.नी. राहुल चव्हाण सोबत पो.हवा सचिन वेळेकर, पो.ना अमोल नागरे सह पोलीस कर्मचा-यांनी पार पाडली.