संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- आगामी हनुमान जयंती ,भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती या सनादरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल असे नागरिकांनी वागू नये,शिवाय सोशल मिडियावरील अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच हे सण उत्सव कायदा व सण उत्सव चे पालन करून सौहाद्रपूर्ण वातावरणात साजरे करून प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन सहाय्यक पोलीस आयुक्त बी एन नलवाडे यांनी केले.
आगामी सण उत्सवच्या पाश्वरभूमीवर आज सोमवार 3 एप्रिल ला सायंकाळी पाच वाजता नवीन कामठी पोलीस स्टेशन सभागृहात पोलीस प्रशासनातर्फे आयोजित शांतता समितीच्या बैठकीत ते बोलत होते याप्रसंगी एसीपी नलवाडे , वरिष्ठ पोलीस निरीक्षक भरत क्षीरसागर,जुनी कामठी पोलीस स्टेशन चे पोलिस निरीक्षक दीपक भिताडे ,दुय्यम पोलीस निरीक्षक ,वाहतूक पोलीस निरीक्षक गोसावी,मुख्याधिकारी संदीप बोरकर ,विद्दुत वितरन विभागाचे राठोड,आदी उपस्थित होते .
याप्रसंगी एसीपी नलवाडे यांनी सांगितले की आगामी सण उत्सवांचा उत्साह सर्वत्र आहे. या सनानिमित्त निघणाऱ्या मिरवणुकीत कुठलीही अनुचीत घडणार नाही यासाठी प्रत्येकाने दक्षता घेणे गरजेचे आहे.कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी प्रशासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे सर्वांनी पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे.आगामी उत्सवांच्या पाश्वरभूमीवर प्रशासनातर्फे आवश्यक त्या उपाययोजना केल्या जातील असेही सांगितले.तसेच हनुमान जयंती व डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त निघणाऱ्या मिरवणुका ह्या सुरळीतपने पार पडावे या विषयावर मौलिक असे मार्गदर्शन केले.
मुख्याधिकारी संदीप बोरकर यांनी सांगितले की आगामी सण उत्सव सर्वांनी शांततामय वातावरणात साजरे करावे ,कामठी नगर परिषदतर्फे आवश्यक त्या उपाययोजना करणे सुरू करण्यात आले आहे.रस्त्याची दुरुस्ती,पथदिवे,स्वछता यावर जोर देण्यात येत आहे.कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासनातर्फे नियोजन करून आवश्यक ती काळजी घेण्यात येत आहे.सर्व नागरिकांनी सामाजिक, एकोपा व सामंजस्य राखून उत्सव शांततेत पार पाडून कामठी शहराचा नावलौकिक वाढवावा असे आवाहन करण्यात आले.
पोलीस निरीक्षक भरत क्षीरसागर व जुनी कामठी पोलीस निरीक्षक दीपक भिताडे यांनी सांगितले की जयंती व उत्सवाच्या पाश्वरभूमीवर थोर नेत्यांचे विचार नागरिका पर्यंत पोहोचविण्यासाठी सार्वजनिक मंडळांनी प्रचार व प्रसार करावा .उत्सव साजरे करताना सामान्य नागरिकाला त्रास होणार नाही याची दक्षता घेऊन कायदा व सुव्यवस्थेचे पालन करावे असे आवाहन त्यांनी केले.यावेळी मनीष वाजपेयी, लाला खंडेलवाल, कपिल गायधने, विजय कोंडुलवार, सुगत रामटेके,विद्या भीमटे अशा अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी आपले मनोगत व्यक्त करून विधायक सूचना मांडल्या.
यावेळी या शांतता कमिटी बैठकीत शांतता कमिटी सदस्य,प्रतिष्ठित नागरिक, दोन्ही जयंती कार्यक्रमाचे आयोजक व मिरवणूक प्रमुख,तालुका प्रशासन,पोलीस प्रशासन,नगर परिषद विद्दूत विभाग, महसूल विभाग,आरोग्य विभागाचे प्रतिनिधी,,व्यापारी संघटनेचे पदाधिकारी यासह सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येत उपस्थित होते.