संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
मुंबई :- मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदावर शिंदेसेनेचे प्रभाकर उर्फ प्रभू पाटील यांची निवड करण्यात आली आहे उपसभापती पदावर हुकुमचंद आमधरे यांची नियुक्ती केली असून दोन्ही पदाची निवड बिनविरोधी करण्यात आली आहे.
आशिया खंडातील सर्वात मोठी सहकारी बाजारपेठ असलेला मुंबई बाजार समितीच्या सभापती पदावर कोणाची निवड होणाऱ याकडे सर्वांचे लक्ष लागून होते शासनाच्या माध्यमातून वनमंत्री गणेश नाईक यांच्या उमेदवार निश्चितीची चिठ्ठी देण्याचे अधिकार देण्यात आले होते बाजार समितीचे सभागृहात दोन वाजता प्रत्यक्ष निवडणुकीला सुरुवात झाली. सभापती पदासाठी शिंदेसेनेचे प्रभाकर उर्फ प्रभू पाटील व उपसभापदासाठी नागपूर महसूल विभागातील हुकुमचंद आमधरे यांचे अर्ज भरला व पाटील आणि आमदधरे यांची बिनविरोध निवड झाली.