नागपूर :- जागतिक कीर्तीचे बौद्ध धम्मगुरु व दीक्षाभूमी स्मारक समितीचे अध्यक्ष भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांच्या हस्ते आंबेडकरी विचारवंत व बसपा नेते उत्तम शेवडे यांना उद्या जीवन गौरव पुरस्कार देण्यात येणार आहे.
नागपूर तहसील व जिल्ह्यातील बनवाडी ह्या गावात 2016 रोजी भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांच्या हस्ते बुद्धमूर्ती स्थापना व बुद्ध विहाराचे लोकार्पण करण्यात आले होते. हे बुद्ध विहारच मुळात *भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई बुद्ध विहार* या नावाने आहे. 20 नोव्हेंबर 2023 ला या विहाराचा सातवा वर्धापन दिन असल्याने वैशाली महिला मंडळ व पंचशील नवयुवक उत्साही मंडळांनी बनवाडी या गावातील मूळ निवासी असलेले उत्तम शेवडे यांना भंतेजींच्या हस्ते जीवनगौरव पुरस्कार वितरण करण्यात आला आहे.
हा पुरस्कार सोहळा 20 नोव्हेंबरला सायंकाळी 4 वाजता नागपूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक हरि गाडबैल यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला.