संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- स्थानिक जुनी कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या बजरंग पार्क येथे मनीष तरारे यांच्या घरी भाड्याने वास्तव्य करीत असलेल्या अवविहित तरुणाने भाड्याच्या खोलीतील सिलिंगच्या लोखंडी हुक ला ओळणीने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी 8 वाजता निदर्शनास आली असून मृतक तरुणाचे नाव प्रज्वल हरणे वय 22 वर्षे रा बजरंग पार्क कामठी असे आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी त्वरित घटनास्थळ गाठून घटनास्थळाचा पंचनामा करीत मृतदेह ताब्यात घेत मृतदेहाच्या पार्थिवावर शासकीय उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले.आत्महत्येचे कारण अजूनही कळू शकले नाही पोलिसांनी तूर्तास आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे