महानगरपालिकेतर्फे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवनिमित्त विविध स्पर्धांचे आयोजन

चंद्रपूर  : चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या वतीने स्वच्छ भारत मोहिमेअंतर्गत स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवनिमित्त विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी २८ नोव्हेंबर रोजी शेवटची तारीख आहे.

भारतीय स्वातंत्र्याची 75 वर्षे ‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’ साजरा करण्यासाठी चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या वतीने विविध उपक्रम घेण्यात येत आहेत.

चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या वतीने स्वच्छ भारत मोहिमेअंतर्गत विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये जिंगल स्पर्धा, पथनाट्य स्पर्धा, म्युरल आर्ट स्पर्धा, शॉर्ट मूवी स्पर्धा, चित्रकला आणि पोस्टर मेकिंग स्पर्धा देखील आयोजित करण्यात आली आहे. या विविध स्पर्धांचे फोटो, व्हिडिओ, सॉफ्टकॉपी
infocspcreations@gmail.com या मेल आयडीवर २८ नोव्हेंबरपर्यंत पाठवा. प्राप्त प्रवेशिकेतून सर्वोत्कृष्ट निवडण्यात येवून पारितोषिक देण्यात येईल तसेच प्रोत्साहनपर बक्षीसही दिले जाणार आहेत. या सर्व स्पर्धांमध्ये जास्तीत जास्त संख्येने सहभागी होण्याचे आवाहन चंद्रपूर शहर महानगरपालिकेने केले आहे.

दिनेश दमाहे
9370868686

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

News Today 24x7

Next Post

संविधान दिनानिमित्त पूर्व नागपुरात बाबासाहेबांना अभिवादन व प्रास्ताविका वाचन

Sat Nov 27 , 2021
नागपूर : संविधान दिनानिमित्त शुक्रवारी २६ नोव्हेंबर रोजी पूर्व नागपूर अंतर्गत सेंट्रल एव्हेन्यू मार्गावरील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये बाबासाहेबांच्या पुतळ्याला आमदार कृष्णा खोपडे यांनी अभिवादन केले. यावेळी भाजपा प्रदेश सचिव ॲड. धर्मपाल मेश्राम, मंडळ अध्यक्ष संजय अवचट, शहर संपर्क प्रमुख प्रमोद पेंडके, प्रसिद्धी प्रमुख चंदन गोस्वामी, अनुसूचित जाती मोर्चा मंडळ अध्यक्ष बाळाभाऊ वानखेडे प्रामुख्याने उपस्थित होते. याप्रसंगी महेंद्र राउत, नगरसेवक प्रदीप पोहाणे, नगरसेविका कांता रारोकर, नगरसेवक अनिल गेंडरे, जे.पी. शर्मा, इंद्रजीत वासनिक, अविनाश […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com