अनोळखी इसमाचा रेल्वे अपघाती मृत्यु

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- इतवारी कामठी रेल्वे पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या सावला रेल्वे स्टेशन रेल्वे की मी नंबर 1106/26-28 अनंतराव एका अज्ञात रेल्वेगाडीच्या धडकेने अनोळखी इसमाचा अपघाती मृत्यू झाल्याची घटना मध्यरात्री 2 वाजता घडली.

घटनेची माहिती मिळताच रेल्वे पोलिसांनी त्वरित घटनास्थळ गाठून घटनास्थळाचा पंचनामा करीत मृतदेह ताब्यात घेऊन पुढील उत्तरीय तपासणीसाठी शासकीय उपजिल्हा रुग्णालयाच्या शवविच्छेदनगृहात हलविण्यात आले. पोलिसांनी तूर्तास आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून मृतकाची ओळख अजूनही पटलेली नाही.मृतकाची उंची 5 फूट पाच इंच,रंग गोरा, केस काळ्या रंगाचे, अंगावर हिरव्या रंगाचे हाफ शर्ट, काळ्या रंगाचे लोअर,उजव्या हाताच्या पंजावर दिल हे चिन्ह व त्यामध्ये c असे कोरलेले आहे.तेव्हा असे वर्णनाचे व्यक्ती ओळखीचे वाटल्यास तपासी अंमलदार अजय चरडे यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात येत आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

चंद्रपूर महानगरपालिका शाळांत प्रवेशोत्सव संपन्न

Fri Jun 30 , 2023
चंद्रपूर :- चंद्रपूर महानगरपालिकेच्या २७ शाळांमध्ये प्रवेशोत्सव कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला. शाळेतील सर्व विद्यार्थांना महानगरपालिकेतर्फे दप्तर,बुट मोजे, टाय, बेल्ट ,पुस्तक ,गणवेश देऊन विद्यार्थांचे स्वागत करण्यात आले.     सावित्रीबाई फुले उच्च प्राथमिक व माध्यमिक शाळा मनपा येथे प्रवेशोत्सव कार्यक्रमाला मनपा मुख्य शहर अभियंता महेश बारई यांच्या अध्यक्षतेखाली विवेक उध्दरवार ,कार्यकारी अभियंता ,महाराष्ट्र जिवन प्राधिकरण ,विवेक तामण ,विभागीय अभियंता ,महाराष्ट्र जिवन […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com