परदेशातून भारतात येणाऱ्या प्रवाशांसाठी केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाची कोविड-19 मार्गदर्शक तत्त्वे सुलभ

नवी दिल्‍ली :- जगभरातील सध्याची कोविड-19ची प्रचलित स्थिती आणि कोविड-19 लसीकरणामध्ये केलेल्या महत्त्वपूर्ण कामगिरीची दखल घेवून परदेशातून भारतामध्‍ये येणाऱ्या प्रवाशांसाठी कोविड-19 संदर्भातील मार्गदर्शक तत्त्वे, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने अधिक सुलभ केली आहेत.

भारतीय प्रमाण वेळेनुसार 20 जुलै 2023 च्या मध्‍यरात्रीपासून (रात्री 12.00वाजता) नवीन मार्गदर्शक तत्वे लागू होणार आहेत. या नवीन मार्गदर्शक तत्त्वांनुसार, भारतात येणाऱ्या आंतरराष्‍ट्रीय प्रवाशांपैकी 2 टक्के प्रवाशांना आर टी-पीसीआर चाचणी करणे गरजेचे होते. आता या चाचणीची आवश्यकता राहणार नाही.

तथापि, कोविड-19 च्या संदर्भात एअरलाइन्स तसेच आंतरराष्ट्रीय प्रवाशांनी पाळण्याच्या सावधगिरीच्या उपाययोजना पूर्वीप्रमाणेच लागू असतील.

अद्ययावत मार्गदर्शक तत्त्वांची माहिती, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर (https://www.mohfw.gov.in/) उपलब्ध करून देण्यात आली आहे. आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्यावतीने कोविड-19 स्थितीकडे निरंतर लक्ष ठेवून आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

वारेगाव एश डेम्प फूटल्याने मोठ्या प्रमाणात शेतपिकाचे नुकसान..

Wed Jul 19 , 2023
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी ता प्र 19:-कामठी तालुक्यांतर्गत येणाऱ्या वारेगाव येथे राखमिश्रित एश डेम्प फुटल्याने वारेगाव सह नजीकच्या शेतातील परिसर राखमीश्रित जलमय होत हे राखमिश्रित पाणी शेतात शिरल्याने मोठ्या प्रमाणात शेतपिकाचे नुकसान झाले.ही घटना आज सायंकाळी 5 दरम्यान घडली. घटनेची माहिती मिळताच तहसीलदार अक्षय पोयाम सह संबंधित अधिकाऱ्यांनी त्वरित घटनास्थळ गाठून परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासनिक स्तरावर प्रयत्न सुरू आहेत.मात्र […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com