संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- दरवर्षी प्रमाणे या वर्षी धम्मचक्र प्रवर्तन दिना निमित्त नागपूर येथील दिक्षा भुमी वरून कामठी येथील विश्वविख्यात ड्रैगन पैलेस टेम्पलला लाखो बौध्द बांधव भेट असतात. परंतु रेल्वे ओवर ब्रिजचे काम गेल्या तिन वर्षा पासुन रखडल्यामुळे रमा नगर मार्गानी बसेस व चार चाकी वाहन ड्रैगन पैलेस टेम्पल पर्यंत पोहचु शकणार नाही. या मार्गाची लोककर्म विभागाने त्वरीत दुरूस्ती केल्यास लोकांना येणे शक्य होईल अशी मागणी ॲड. सुलेखा कुंभारे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी त्यांच्या निवास स्थान घेतलेल्या बैठकीत केले.
तसेच अजनी रोडवर सुरू असलेल्या अंडरपास ब्रिजचे सुध्दा काम पूर्ण करण्याची मागणी सुध्दा या बैठकीत करण्यात आली.
मंत्री नितीन गडकरी यांनी उपस्थीत अधिका-यांकडून सुरू असलेल्या रमा नगर रेल्वे ओवर ब्रिज तसेच अजनी रोडवरील रेल्वे अंडरपास ब्रिजच्या कामाचा आढावा घेतला. मंत्री महोदयांनी रखडलेल्या कामाबद्दल नाराजी व्यक्त करीत येणा-या धम्मचक्र प्रवर्तन दिना निमित्त ड्रैगन पैलेस टेम्पलला लाखोंच्या संख्येनी भेट देणा-या बौध्द बांधवांकरिता रमा नगर येथुन जाणा-या रस्त्याला त्वरीत पूर्ण करून बसेस व चार चाकी वाहणांकरिता त्वरीत मार्ग उपलब्ध करून देण्याचे निर्देश लोककर्म विभागाच्या वरिष्ठ अधिका-यांना दिले. तसेच अजनी रोड वरील रेल्वे अंडरपास ब्रिजच्या बांधकामाची संयुक्त पाहणी करून काम पूर्णता: नेण्याच्या संदर्भात योग्य ती कार्यवाई करावी असे निर्देश साउथ ईस्टर्न सेंटर रेल्वेच्या डी. आर. एम नमिता त्रिपाठी यांना दिले.
केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्या निवास स्थानी संपन्न झालेल्या बैठकीमध्ये माजी राज्यमंत्री व ओगावा सोसायटीच्या अध्यक्षा ॲड. सुलेखा कुंभारे सह ओ.एस.डी. ठेंग, साउथ ईस्टर्न सेंटर रेल्वेच्या डी. आर. एम नमिता त्रिपाठी, लोककर्म विभागाचे अधिक्षक अभियंता . भानुसे, कार्यकारी अभियंता टिकले ईत्यादी अधिकारी प्रमुख्याने उपस्थित होते.