केंदीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते १ एप्रिलला नागपूरच्या इंदोरा चौक- ते – दिघोरी चौक या प्रस्तावित उड्डाणपुलाच्या बांधकामाचे भूमिपूजन होणार..

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

नागपूर – केंदीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते 1 एप्रिल , शनिवार रोजी नागपूर शहरातील इंदोरा चौक-अशोक चौक-शीतला माता चौक-दिघोरी चौक या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 353 डी वर प्रस्तावित उड्डाणपुलाच्या बांधकामाचे भूमिपूजन सायंकाळी 5 वाजता गोळीबार चौक तसेच सायंकाळी 6:30 वाजता सक्करदरा चौक येथे होणार आहे . याप्रसंगी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत .

सुमारे 998 . 27 कोटी रुपयांच्या तरतूदीने बांधण्यात येणाऱ्या या प्रस्तावित उड्डाणपूलाची लांबी

8.9 किमी असून या प्रकल्पातील सर्व्हिस रोडची लांबी 13.82 किमी राहणार आहे . या प्रकल्पाचे बांधकाम पूर्ण करण्यासाठी 3 वर्षाचा कालावधी निश्चित करण्यात आला आहे .

या उड्डाणपुलाची रचना 2 लेनच्या रूपात केली आहे ज्याची रुंदी 12 मीटर आहे.

उड्डाणपुलाची रचना UHPFRC (अल्ट्रा हाय परफॉर्मन्स फायबर रिइन्फोर्स्ड काँक्रीट) ने केली आहे . या प्रकल्पात दोन ROB – रेल्वे उड्डाणपुल आणि RUB रेल्वे भूयारी मार्गाचा प्रस्ताव समाविष्ट केला आहे.

नागपूरच्या पाचपावली येथील विद्यमान ROB तोडून त्याची पुनर्बांधणी केली जाईल, पूर्व दिशला (नाईक तलावाच्या दिशेने) आणि पश्चिमेकडील (पाचपावलीच्या दिशेने) विद्यमान रॅम्प कायम ठेवले जातील .

डागा स्मृती स्त्री रुग्णालयात अप/डाऊन रॅम्प प्रस्तावित आहे.

भंडारा रोड, मेडिकल चौक आणि नागपूर बसस्थानकाकडे सध्याच्या जोडलेल्या रस्त्यांकडे अप/डाऊन रॅम्पसह अशोक चौकात एक एलिव्हेटेड रोटरी ( चक्राकार रस्ता) म्हणून पायलॉनची रचनाही यात प्रस्तावित आहे.

उड्डाणपुलाच्या बांधकामा अंतर्गतच रस्तेही विकसित केले जातील ज्यामध्ये 3 प्रमुख जंक्शन आणि 11 लहान जंक्शन यांचा समावेश राहणार आहे .

हा प्रस्तावित उड्डाणपुल उत्तर नागपुरच्या इंदोरा चौकापासून सुरू होईल आणि दक्षिण नागपूरच्या दिघोरी चौक येथे संपेल. या उड्डाणपूलाचा भाग दाट लोकवस्तीच्या नागरी भागातून जात आहे जेथे अनेक व्यावसायिक आस्थापने, दुकाने, स्थानिक बाजार आहेत. या भागात होणारी वारंवार वाहतूक कोंडी, अपघात, रेल्वे क्रॉसिंगवर जाम या समस्या प्रस्तावित उड्डाणपुलाच्या बांधकामाने सुटणार आहेत . भंडारा आणि उमरेडच्या दिशेने जाणारी वाहतूक देखील सुरळित होईल .

जंक्शन विकसित केल्याने अपघातांची संख्या कमी होईल तसेच प्रवासाच्या वेळेत शहरी भागात प्रदूषण नियंत्रणासह इंधनाची बचत होईल .

इंदोरा चौक ते सीए रोड, दिघोरी, उमरेड, शासकीय रुग्णालय, बस स्थानक या दिशेने प्रवासाचा वेळ आणि इंधनाची सुद्धा बचत होणार आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

कन्हान नदी नविन पुलाच्या दोन कप्याच्या जोड मध्ये धोकादायक अंतर..

Thu Mar 30 , 2023
नविन पुलावरील गड्डे, भेगा, दोन कप्याच्या जोड मध्ये वाढलेले अंतराने बांधकामावर प्रश्न.  कन्हान : – नदीवर नवनिर्मित पुलाचे उद्घाटन होऊन फक्त सहा महिने झाले असुन पुलावर दोन ते तीन वेळा मोठ मोठे गड्डे पडले आणि आता कप्याच्या जोड मध्ये चांगले अंतर वाढुन धोकादायक परिस्थिती अस ल्याने राष्ट्रीय महामार्ग अधिकारी यांचे कार्यप्रणाली आणि पुलाचा बांधकामावर प्रश्न निर्माण झाल्याने माजी खासदार प्रकाश […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!