केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते ‘तेरवं’ चित्रपटाच्या ट्रेलरचे लॉन्चिंग

नागपूर :- केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. नितीन गडकरी यांच्या हस्ते श्याम पेठकर लिखित व हरिश इथापे दिग्दर्शित ‘तेरवं’ या चित्रपटाच्या ट्रेलरचे अलीकडेच लॉन्चिंग झाले. येत्या ८ मार्चला महिला दिनी संपूर्ण महाराष्ट्रात हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

ना. नितीन गडकरी यांच्या निवासस्थानी झालेल्या या कार्यक्रमाला चित्रपटाचे लेखक श्याम पेठकर, संगीतकार वीरेंद्र लाटणकर, ज्येष्ठ रंगकर्मी श्रद्धा तेलंग, अभिनेत्री नेहा दंडाळे, अभिनेते देवेंद्र लुटे, पत्रकार अजय बिवडे यांची उपस्थिती होती. ‘विदर्भातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या हा संवेदनशील मनाला अस्वस्थ करणारा विषय आहे. विदर्भ-मराठवाडा-खानदेश या भागातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी या आत्महत्या केल्या आहेत. हा एक अत्यंत संवेदनशील विषय असून ‘कॉटन सॉईल तंत्र’ या संदर्भात काम होणे गरजेचे आहे,’ असे ना. गडकरी म्हणाले. श्याम पेठकर यांनी याआधी ‘गोष्ट छोटी डोंगराएवढी’ या चित्रपटाच्या माध्यमातून शेतकरी आत्महत्येचा विषय अत्यंत परिणामकारक मांडला होता आणि आता त्यांनी आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील एकल स्त्रीच्या म्हणजेच शेतकऱ्याच्या पत्नीच्या संघर्षावर ‘तेरवं’ हा चित्रपट लिहिला आहे. विदर्भातील प्रयोगशील नाट्यदिग्दर्शक हरिश इथापे यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केलेले आहे. अंजनी कृपा प्रॉडक्शनच्या माध्यमातून नरेंद्र जिचकर यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे. शाम पेठकर यांनी प्रास्ताविक केले. संपूर्ण चित्रपट विदर्भाच्या भाषेत असून, यातील बहुतांश कलावंत विदर्भातील आहेत. चित्रपटाचे छायांकन सुप्रसिद्ध छायाचित्रणकार सुरेश देशमाने यांचे आहे. या चित्रपटात किरण खोजे, संदीप पाठक, किरण माने, नेहा दंडाळे, मधु जोशी, श्रद्धा तेलंग, प्रभाकर आंबोने, वत्सला पोलकमवार, प्रवीण इंगळे, देवेंद्र लुटे, यशवंत चोपडे, शर्वरी पेठकर, संहिता इथापे, वैदेही चवरे, दिलीप देवरणकर या कलावंतांनी भूमिका साकारल्या आहेत. सुप्रसिद्ध वऱ्हाडी कवी दिवंगत शंकर बडे यांच्या कवितेला गाण्याचा साज देण्यात आलेला आहे. चित्रपटाचे संकल्प गीत ज्ञानेश वाकुडकर यांनी लिहिले आहे. आणखी दोन गाणी श्याम पेठकर यांनी लिहिलेली आहेत.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

दिव्यांग, विद्यार्थी, ज्येष्ठ, आजाराग्रस्तांना सवलतीचा प्रवास, परिवहन विभागाचा अर्थसंकल्प मनपा आयुक्तांना सादर

Tue Feb 27 , 2024
नागपूर :- दिव्यांग, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, अनुसूचित आजारग्रस्त आदींना नागपूर महानगरपालिकेच्या परिवहन सेवेमध्ये सवलत कायम ठेवित इतर प्रवाशांच्या भाड्यामध्ये देखीले कुठलीही वाढ न करणारा परिवहन विभागाचा सर्वसमावेशी अर्थसंकल्प मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांना परिवहन व्यवस्थापक रवींद्र भेलावे यांनी सादर केला. नागपूर महानगरपालिकेच्या परिवहन विभागातर्फे सन २०२३-२४ चा सुधारित व २०२४-२५ चा प्रस्तावित अर्थसंकल्प ‘ब’ अतिरिक्त आयुक्त आंचल […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com