स्वच्छ भारत अभियान : उपद्रव शोध पथकाची कारवाई

नागपूर :- स्वच्छ भारत अभियान अंतर्गत नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने मंगळवारी (ता.28) 6 प्रतिष्ठानांवर कारवाई करून 45 हजार रुपयांचा दंड वसूल केला. मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांच्या मार्गदर्शनात लक्ष्मीनगर झोन अंतर्गत प्रतापनगर, रिंग रोड येथील संतोष इलेक्ट्रॉनिक यांच्याविरुध्द रस्त्यालगत बांधकाम साहित्य पसरविल्याबद्दल कारवाई करून 10 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

तसेच रामदासपेठ येथील Chindaman Restro यांच्याविरुध्द फुटपाथचा गैरवापर आणि अस्वच्छता आढळून आल्याबद्दल कारवाई करून 5 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. धरमपेठ झोन अंतर्गत रामनगर चौक येथील M/s Bisava Broking Pvt Ltd आणि बजाजनगर येथील M/s Wok Wood Hukka Parlour यांच्याविरुध्द रस्त्यालगत कार्यालयातील कचरा फेकल्याबद्दल कारवाई करून प्रत्येकी 5 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. हनुमाननगर झोन अंतर्गत महाविष्णु नगर, नरसाळा, दिघोरी येथील विजय ठाकरे यांच्याविरुध्द जवळच्या मोकळया जागेवर कचरा आणि चिखल टाकल्याबद्दल कारवाई करून 5 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. धंतोली झोन अंतर्गत शताब्दी चौक, मनीष नगर येथील चक्रपाणी पंचकर्मा हॉस्पीटल यांच्याविरुध्द विनापरवानगीने विद्युत खांबावर डिस्प्ले बॅनर / होर्डिग लावल्याबद्दल कारवाई करून 15 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.

Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com