केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी नवी दिल्ली येथे राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळाच्या (एनसीडीसी) 89 व्या महापरिषदेच्या बैठकीला केले मार्गदर्शन

– पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘सहकार से समृद्धी’ या संकल्पनेच्या पूर्ततेसाठी ‘एनसीडीसी’ची महत्वपूर्ण भूमिका- अमित शहा

– एनसीडीसी 2013-14 मध्ये केलेल्या 5,300 कोटी रूपयांच्या वितरणापेक्षा, चालू आर्थिक वर्षात 10 पट वाढ साध्य करण्यासाठी सज्ज

नवी दिल्ली :- केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी नवी दिल्ली येथे राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळाच्या (एनसीडीसी) 89 व्या महापरिषदेच्या बैठकीला मार्गदर्शन केले.

आपल्या भाषणात अमित शहा म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ‘सहकार से समृद्धी’चे स्वप्न पूर्ण करण्यामध्‍ये ‘एनसीडीसी’ महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहे. ज्या देशातील 60 कोटी लोकसंख्येकडे भांडवलाचा अभाव आहे, अशा देशामध्‍ये आर्थिक विकास साध्‍य करण्‍यासाठी सहकार हे एकमेव माध्यम आहे.

सहकार मंत्री अमित शहा म्हणाले की, एनसीडीसीमार्फत भारत सरकारच्या विविध योजनांचे कार्यान्वयन केले जात आहे आणि सहकारी संस्थांना लाभ मिळावा यासाठी अनुदानाचा निधी ही संस्‍था आपल्याकडील कर्जाला जोडते. ते म्हणाले की, एनसीडीसीने ग्रामीण भागासह देशभरात 2022-23 या आर्थिक वर्षात 41,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त आर्थिक सहाय्य वितरित केले आहे. सहकार मंत्री म्हणाले की, वर्ष 2013-14 मध्ये या संस्थेने 5,300 कोटी रूपये वितरित केले होते; आता चालू आर्थिक वर्षात या वितरणामध्‍ये 10 पट वाढ करण्‍याचे म्हणजे 2023-2024 मध्‍ये अर्थसहाय्य वितरणाचे लक्ष्‍य 50,000 कोटी रूपये ठेवले असून शहा म्हणाले की, अशा प्रभावी कामगिरीमुळे एनसीडीसी 50,000 कोटी रुपये वितरण करण्‍याचे उद्दिष्ट गाठू शकेल, असा मला विश्वास आहे.

केंद्रीय सहकार मंत्री म्हणाले की, एनसीडीसीने प्रत्येक तिमाहीसाठी उद्दिष्ट निश्चित केले पाहिजे. त्यानुसार पुढील 3 वर्षात वार्षिक 1 लाख कोटी रुपये वितरणाचे लक्ष्य निश्चित केले पाहिजे.

मंत्री अमित शहा यांनी देशातील सहकारी विकासाला मदत करण्यासाठी एनसीडीसीच्या भूमिकेचे कौतुक केले. ते म्हणाले की, कृषी विपणन आणि गुंतवणूक, प्रक्रिया, साठवणूक आणि शाीतगृहाच्या शृंखलेपर्यंत समाजाच्या सर्व गरजा लक्षात घेऊन, देशातील तरुणांचे उत्पन्न वाढवण्‍यासाठी एनसीडीसीच्या कार्यक्षेत्रात आवश्‍यक त्या सर्व घटकांचा समावेश करण्यात आला आहे. ते म्हणाले की, देशात 8 लाखांहून अधिक सहकारी संस्था असून त्यांचे 29 कोटी शेतकरी सदस्य आहेत.

देशातील ‘पीएसीएस’ म्हणजेच प्राथमिक कृषी पतसंस्थांचे पोटनियम वेगवेगळे आहेत. त्यांच्या कामकाजात एकसमानता आणण्याचे काम सुरू असल्याचेही सहकार मंत्री शहा यांनी यावेळी सांगितले.

अमित शहा म्हणाले की, ‘एनसीडीसी’ ची क्षमता ओळखून, सहकारी क्षेत्रातील जगातील सर्वात मोठ्या अन्न साठवणूक योजनेंतर्गत प्रकल्प अंमलबजावणी एजन्सी म्हणून या संस्थेची निवड करण्यात आली आहे. ‘एनसीडीसी’ ने निर्यात, सेंद्रिय आणि बियाणे उत्पादन या तीन नवीन राष्ट्रीय स्तरावरील सहकारी संस्थांना प्रोत्साहन देण्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे, त्यामुळे या संस्था सहकारी क्षेत्रातील अनेक मोठ्या ब्रँडप्रमाणे त्यांच्या व्यवसायात मोठ्या होतील, यावर केंद्रीय सहकार मंत्र्यांनी भर दिला.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

शहरी योजनांवरील गुंतवणूकीमध्‍ये 2014 पासून लक्षणीय वृद्धी : गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्री हरदीपसिंह पुरी

Tue Oct 10 , 2023
– आर्थिक संसाधने वाढवण्यासाठी ‘म्युनिसिपल बॉण्ड्स’ सारखे नाविन्यपूर्ण मार्ग स्‍वीकारण्‍याचे शहरांना आवाहन नवी दिल्ली :- जागतिक अधिवास दिनाचे महत्त्व आता अधिकाधिक समजत आहे, असे प्रतिपादन गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार आणि पेट्रोलियम आणि नैसर्गिक मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी केले. वर्ल्ड हॅबिटॅट डे (डब्ल्यूएचडी) 2023 च्या मेळाव्याला ते मार्गदर्शन करत होते. यावेळी, 1980 च्या दशकात ‘डब्ल्यूएचडी’ च्या संकल्पनेची आठवण करून देताना […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!