गुंठेवारी योजनेअंतर्गत आयुक्तांच्या हस्ते ४ लाभार्थ्यांना मिळाले नियमित करणाचे प्रमाणपत्र, आतापर्यंत एकुण १९२ लाभार्थ्यांना मिळाला लाभ  

चंद्रपूर :- महाराष्ट्र गुंठेवारी विकास ( नियमाधीन करणे,श्रेणीवाढ व नियंत्रण ) अधिनियम २००१ अंतर्गत आतापर्यंत शहरातील १९२ नागरीकांना मिळाले भुखंड / बांधकाम नियमित करणाचे पत्र चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे देण्यात आले आहे.

मनपामार्फत गुंठेवारी अंतर्गत प्रकरणे नियमित करण्याचे काम प्रगतीपथावर असुन नागरीकांना लवकरात लवकर याचा लाभ मिळावा यादृष्टीने कार्य केले जात आहे. २५ नोव्हेंबर रोजी मौजा वडगाव येथील सर्वे नंबर १६/१,१७ व १८ पैकी मंजुर अभिन्यासामधील नामदेव गणपती दिवसे, पराग प्रभाकरराव कन्नमवार, प्रेमलाल तुलसीराम भोई व राहुल भाऊराव साव या ४ लाभार्थ्यांना भुखंड / बांधकाम नियमित करणाचे प्रमाणपत्र आयुक्त विपीन पालीवाल यांच्या हस्ते देण्यात आले.

तसेच ३ नागरीकांना विकास शुल्क भरण्यास कळविण्यात आलेले असुन त्यांनी अद्याप शुल्क भरलेले नाही तरी त्यांनी १५ दिवसांच्या आत शुल्काचा भरणा करावा अन्यथा त्यांचे प्रकरण रद्द करण्यात येईल व त्यांच्या भुखंड / बांधकामावर महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम १९९६ नुसार निष्कासनाची कार्यवाही प्रस्तावित करण्यात येणार असल्याचे चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.

मंजूर अभिन्यासामधील अनधिकृत भुखंड / बांधकाम धारकांनी भुखंड / बांधकाम नियमानुकुल करण्याबाबत अर्ज मनपा कार्यालयास सादर केला नसल्यास त्वरीत अर्ज सादर करावा. तसेच त्रुटींची पुर्तता करण्याबाबत मनपा कार्यालयातुन कळविण्यात आले असल्यास ७ दिवसांच्या आत कागदपत्रांची / त्रुटींची पुर्तता करून घ्यावी अन्यथा सदर भुखंड / बांधकामावर महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम १९९६ नुसार निष्कासनाची कार्यवाही प्रस्तावित करण्यात येणार असल्याचे चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.

 

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

CBDT SCC organises 2-day All India Cultural Festival “Aayakar Sanskritik Utsav” in Nagpur

Mon Nov 28 , 2022
Nagpur :- The Central Board of Direct Taxes Sports and Cultural Committee [CBDT SCC] has organised 2-day All India Cultural Festival “Aayakar Sanskritik Utsav” at National Academy of Direct Taxes (NADT), Nagpur with close support from the local Pr. CCIT, Nagpur region. This is the first all India cultural event that is being organized under the aegis of CBDT SCC. […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com