राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार यांच्या गटातील सुनीता येरणे यांचा पक्षाला राम राम

– अजित पवार यांच्या पक्षात मुंबईत मुख्य कार्यालयात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत जाहीर प्रवेश

मुंबई :-  12 मार्च 2024 रोजी सुनीता येरणे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, कार्यध्यक्ष प्रफुल पटेल यांच्या शुभहस्ते राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश सचिवपदी नियुक्ती करण्यात आली. त्यावेळी नागपूर जिल्हा निरीक्षक जैन, जिल्हा अध्यक्ष प्रशांत पवार, ग्रामीण जिल्हा अध्यक्ष बाबा गुर्जर, ईश्वर बाळबुधे, आभा पांडे महिला आयुक्त सदस्य, जया देशमुख महिला अध्यक्ष नागपूर शहर, पुष्पा शिंदे शोभा येवले, रेखा चरडे, संगीता अंबरे, सुगंध नानावाणी, रीता शेंडे, अनिता जैन, मंजुषा खोब्रागडे, वनिता काळे व शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. सुनीता येरणे यांनी 17 मार्च 24 रोजी, रवीभवनात पक्षाची मिटिंग आयोजित करून सचिव महाराष्ट्र प्रदेश पद स्वीकार करतांना व शेकडो पदाधिकारी कार्यकर्ते यांनी सुनीता येरणे यांच्या सोबत पक्ष प्रवेश केला. सुनीता येरणे यांनी आपले विचार व्यक्त करतांनी सांगितले की, नागपूर सोबत महाराष्ट्र राज्याच्या संपूर्ण जिल्ह्यातील कार्यकर्त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीसाठी जोमाने व एकजुटीने काम करून पक्षासाठी जे काही करता येईल ते सर्वत्री प्रयत्न करू व निवडणूकीत मोठ्या प्रमाणात विजयी करण्यासाठी काम करू कोणतीही अडचण आल्यास ते सोडवू लवकरच सर्व दौरा करून पक्षश्रेष्ठींना माहिती देऊन आपला पक्ष आणखी मजबूत करू महिला करीता उपाय योजना करण्यास पक्षाला कळून तात्काळ अंबलबजावणी करू त्यावेळी आपले प्रतिपादन व्यक्त केले तसेच नागपूर येथील रविभवनात मिटिंग आयोजित करण्यात आली व पद स्थापन करून व पदाधिकारी कार्यकर्तेनी मोठ्या प्रमाणात पक्ष प्रवेश केला व कार्यकर्तेनी शुभेच्छा दिल्या. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते महिला कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

नागपूरचे विकास पुरुष ओळखले जाणारे, पालनहार केंद्रीयमंत्री नितीन गडकरींनाच निवडून द्या, जनतेला आवाहन - सिध्दु कोमजवार

Tue Mar 19 , 2024
नागपूर :- आगामी लोकसभा निवडणुकीत बिनविरोध निवडून येण्यासाठी नागपूरचे नितीन गडकरींच्या बद्दल एकमताने निर्णय घ्यावा. नागपूर शहरातील महाराष्ट्र लोकसभा मतदार संघातून तिसऱ्यांदा नागपूरचे पालनहार, कार्यसम्राट, विकासपुरुष आणि मोदी सरकारमधील सर्वात लोकप्रिय मंत्री नितीन गडकरी यांची लोकप्रियता पुर्ण देशाला लाभली आहे. नितीन गडकरी म्हणून ओळखले जाणारे लोकप्रतिनिधी म्हणून दोन वेळा निवडून आले यावर्षीही तिसऱ्यांदा तिकीट मिळाले आहे. विशेष म्हणजे भाजपच्या पहिल्या […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com