युक्रेनमध्ये वैद्यकीय शिक्षणासाठी गेलेला खसारा येथील गेलेला तरुण सुखरूप घरी पोहोचल्याने आई वडील बहिण व गावकऱ्यांनी त्याचे जंगी स्वागत केले

– संदीप कांबळे,कामठी

खुशाल पटले यांनी भारतीय दूतावास व केंद्र सरकारचे आभार मानले खुशाल परत दिसताच आई ,वडील व बहिणीच्या डोळ्यातून अश्रू धारा वाहू लागल्या 24 व 25 फरवरी बुडापेस्ट बॉर्डरला दोन दिवस कसे गेले ते देवालाच माहिती खुशाल ने केले मनोगत व्यक्त
केंद्र सरकार व भारतीय दूतावासाचे मानले आभार
कामठीता प्र 3:- तालुक्यातील खसाळा ग्रामपंचायत येथील खुशाल चुनीलाल पटले वय 24 हा सन 2017 मध्ये वैद्यकीय शिक्षणाकरिता गेला असता युक्रेनमध्ये सद्यस्थितीत चालू असलेल्या बॉम्ब हल्ल्यामुळे हादरलेले भारतीय तरुण घरी परतणार च्या मार्गात असताना अनेक बाम हल्ले व विविध समस्यांना तोंड देत खुशाल चुनीलाल पटले आज सायंकाळी सहा वाजता सुखरूप आपल्या घरी पोहोचल्या त्या दरम्यान आई-वडील बहीण व गावकऱ्यांनी त्यांचे जंगी स्वागत केले खुशाल चुनीलाल पटले यांनी सदर प्रतिनिधीने युक्रेन बॉम्ब हल्यातुन मार्ग काढताना आलेल्या विविध अडचणी संघर्ष विषयी मणहाला की खुशाल चुनीलाल पटले वय 24 हा सन 2017 मध्ये डॉक्टरांचे स्वप्न बघून वैद्यकीय शिक्षणाकरिता ओडिसा सिटी युक्रेन येथील युनिव्हर्सिटीमध्ये प्रवेश घेतला होता तेव्हा तिथेच वैद्यकीय अभ्यास करीत असताना जगातील व इतर राज्यातील 350 युनिव्हर्सिटीमध्ये वैद्यकीय शिक्षण घेत आहेत पण नुकतेच काही दिवसांपूर्वी युक्रेन मध्ये झालेल्या बॉम्ब हल्ल्याने सर्व जनजीवन विस्कळीत झाला असून प्रत्येक भारतीय विद्यार्थी व नागरिक देवाच्या कृपेने सुखरूप असून यांनी सांगितले 24 व 25 फरवरी ला आपण पाई पाई निघून चॉप ह्यांग्री झुआन सिटी रेल्वेस्थानकावर आले असता त्यादरम्यान मार्गात बॉम्ब हल्ले मोठ्या प्रमाणात सुद्धा झाले त्या दरम्यान मी वाचलो हे माझे नशीब बलवान असे त्यांनी सांगितले असून 24 व 25 फरवरी हे दोन्ही दिवस रेल्वे स्टेशन अंत्यत वाईट स्थितीत गेल्याचे त्यांनी सांगितले 26 फरवरी ला रेल्वेने बुधापिस्ट सीमेवर पोहचलो तेथे भारतीय दूतावास यांनी आम्हाला दिल्ली येथे जाण्याकरिता विमान सुविधा उपलब्ध करून दिली दिल्लीमध्ये 2 मार्चला रात्री महाराष्ट्र सदन दिल्ली येथे पोचलो तेथे केंद्र सरकारचे वतीनेसर्व सुविधा उपलब्ध झाल्याने तिथेच मी माझ्या देशात माझ्या राज्यात घरी पोहोचण्याचा आनंद मनामध्ये द्विगुणित झाल्याचे त्यांनी व्यक्त केले 2 मार्चला दिल्ली दिल्लीवरून वीमानाने मुंबई विमानतळावर आलो मुंबई विमानतळावरून आज 3 मार्चला सायंकाळी चार वाजता सुमारास नागपूर विमानतळावर पोहोचलो नागपूर विमानतळावर वडील चुनीलाल पटले ,आई चेतना पटले ,बहीण मीनल पटले यांनी खुशालला गळा भेट घेऊन कुशीत घेऊन आनंदा च्या अश्रूच्या धारा सुरु केल्या आई वडील व बहिणीचा आनंद गगनात मावेनासा झाला होता खुशाल पटले यांनी सांगितले की मला या अतिशय वाईट विपरीत परिस्थितीत केंद्र सरकार व भारतीय दूतावासाने केलेली मदत कधीच विसरू शकणार नाही अशा शब्दात त्यांनी व्यक्त केले गावात पोचताच ग्रामपंचायतचे सरपंच रवी पारधी ,निलेश डफरे, सुभाष भोयर, प्रभाकर डाखोडे ,गजानन वैरागडे, अश्विन गभने ,अतुल बावनकुळे व गावकऱ्यांनी त्यांचे जंगी स्वागत करुन मिठाईचे वितरण करून त्य शुभेच्छा दिल्या ,खुशाल पटले यांनी सांगितले की युक्रेन मध्ये माझा अंतिम वर्षाच्या वैद्यकीय अभ्यास सुरू असून युनिव्हर्सिटी युक्रेनमधील विद्यापीठाने शिक्षण सुरू केले तर तिथे जाऊन आपला अभ्यास क्रमपूर्ण करून एक उत्तर डॉक्टर बनवून भारतात येऊन उत्तम सेवा देण्याचा मानस असल्याच्या खुशाल चुनीलाल पटले यांनी सदर प्रतिनिधी जवळ व्यक्त केले

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

भंडारा गोंदीया जिल्ह्यातील गोसीखुर्द प्रकल्पाचा पर्यटन विकास झाल्यास तरुण मुलांना रोजगार मिळेल - मंत्री नितीन गडकरी

Fri Mar 4 , 2022
– राष्ट्रीय महामार्ग 53  वरील     सहापदरी बायपासच्या   कामाचे भूमीपूजन  गडकरींच्या हस्ते संपन्न  नागपूर – ताडोबा ,पेंच, नागझिरा या ठिकाणी पर्यटक येतात यासोबतच भंडारा गोंदीया जिल्ह्यातील  गोसीखुर्द प्रकल्पाचा पर्यटन विकास झाला आणि गोसेखुर्द या  जागतिक दर्जाच्या धरणातील वॉटर स्पोर्ट्स आणि बोटिंग सर्विस चालू झाल्या तर  भंडाऱ्यातील पर्यटनाला चालना मिळेल व  पर्यटनातून तरुण मुलांना रोजगार मिळेल  ,  असे  प्रतिपपादन  […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!