उद्धव ठाकरेंनी मानसिक दिवाळखोरी दाखविली – चंद्रशेखर बावनकुळे यांचा हल्लाबोल

• धर्माच्या आधारावर मते घेण्याची भाषा

• विभाजनाची भाषा करण्यावर आमचा आक्षेप

मुंबई :- उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी ज्या भाषेचा वापर केला आहे, त्यातून त्यांनी मानसिक दिवाळखोरी दाखवून दिली आहे, असा हल्लाबोल भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला. देवेंद्र फडणवीस आणि तुमची काय क्षमता आहे, असाही प्रश्न त्यांनी विचारला.

छत्रपती संभाजीनगर येथे ते वृत्तवाहिन्यांच्या प्रतिनिधींशी बोलत होते. उद्धव ठाकरेंना चिथावणी देणारी भाषा शोभत नाही, असे सांगून बावनकुळे म्हणाले, त्यांनी ज्याप्रकारच्या शब्दांचा वापर केला, ते जर हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी ऐकले असते तर त्यांना काय वाटले असते. उद्धव ठाकरे अशा भाषेचा वापर हिंदुत्व सोडून ख्रिश्चन आणि मुस्लिम मतांच्या भरवशावर करीत आहेत. देवेंद्र फडणवीस राज्याला विकासाकडे नेणारे आणि नवे व्हिजन देणारे नेतृत्त्व आहे. उद्धव ठाकरे हे आता जाती-पातीच्या राजकारणावर उतरले असून धर्माच्या आधारावर मते घेण्याची भाषा करीत आहे. महाराष्ट्रातील जनता त्यांना मतांनी झोडपल्याशिवाय राहणार नाही.

• आरे चे उत्तर कारे मध्ये देऊ!

हे राज्य संस्कारमय राज्य आहे. सर्व धर्म, सर्व समाज येथे एकत्र राहतो. जातीपातीचे राजकारण करून समाजा-समाजात तेढ निर्माण करण्याचे काम उद्धव ठाकरेंनी केले आहे, त्यांच्या विभाजनकारी भाषेवर आमचा आक्षेप आहेच. भाजपा त्याच्या ‘आरे च्या भाषेला कारे’ अशा शब्दात उत्तर देईल.

– ते असेही म्हणाले

• 10 वर्षे मोदींच्या सभामुळे उद्धव ठाकरे यांचे खासदार निवडून आले, पण आता ते उपकार विसरले आहेत.

• एकीकडे भगवान शंकराचे नाव घ्यायचे आणि अशी भाषा वापरायची ही संस्कृती आणि संस्कार आहेत का?

• नाशिक, परभणीच्या व मुंबई येथे उबाठा गटाच्या विजयी मिरवणूकीत पाकिस्तानचे झेंडे झळकले.

• जातीपातीचे राजकारण करून समाजा-समाजात तेढ निर्माण करण्याचे काम उद्धव ठाकरेंनी केले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

वेकोलि को मिले 4 राष्ट्रीय सुरक्षा पुरस्कार

Thu Aug 1 , 2024
नागपूर :- दिनांक 28.07.2024 को कोलकाता में आयोजित ‘Mine Safety Award 2024’ में वेकोलि की 4 खदानों को ‘खान सुरक्षा अवार्ड’ से नवाज़ा गया। समारोह में माध्यम वर्ग की भूमिगत खदानों की श्रेणी में पाथाखेड़ा क्षेत्र की तवा-2 खदान को द्वितीय पुरस्कार प्राप्त हुआ। छोटी भूमिगत खदानों की श्रेणी में नागपुर क्षत्र की सावनेर-2 को तृतीय पुरस्कार प्राप्त हुआ। माध्यम […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com