अमरदिप बडगे, प्रतिनिधी
गोंदियातील प्रसिद्ध प्रोग्रेसिव्ह इंटरनँशनल शाळेतील धक्कादायक प्रकार
शाळा व्यवस्थापन ने शिक्षकांना केले निलंबित
गोंदिया :- शारीरिक सरावादरम्यान सहाव्या वर्गात शिकणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांला शिक्षकाने बेशुद्ध होईपर्यंत दोन शिक्षकांनी काठी आणि पाईपने बेदम मारल्याची धक्कादायक घटना गोंदियातील प्रसिद्ध प्रोग्रेसिव्ह शाळेत घडली असुन याची तक्रार पालकांनी गोंदिया ग्रामीण पोलिसात केली, असून पोलिसांनी तेजेश्वर तुरकर व लालचंद पारधी या दोन्ही शिक्षका विरुद्ध भारतीय दंड १८६०, ३२४, ३४ अनुसूचित जमाती अधिनियम १९८९ ३(२) (५) अंतर्गत गुन्हा नोंद केला. असुन दोन्ही शिक्षकांना अटक करण्यात आली आहे.