अमरदिप बडगे, प्रतिनिधी
भंडारा :- भंडारा जिल्ह्यातील मोहाडी तालुक्यातील देव्हाडा खुर्द या गावातील मनाला सुन्न करणारी घटना घडली आहे. या गावातील दोन लहान सख्ख्या भावंडाचा साप चावल्याने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
मृतक मुलांचे नाव उत्कर्ष बलवीर डोंगरे व सुशील बलवीर डोंगरे असुन दोघांचे वय 7 ते 11 वर्षे असल्याची माहिती मिळत आहे. आपल्या घरी रात्रीच्या वेळी झोपले असता मागच्या दारातून साप आल्याने चावा घेतला . त्यांनतर उत्कर्ष व सुशील याला उपचारासाठी नेताना वाटेत एका भंडारा येथे एकाचा मृत्यू तर दुस-याचा नागपुर जवळ मृत्यू झाला आहे. दोन्ही सख्खे भावंडे आहेत .या घटनेमुळे गावातील परिसरात शोककळा पसरली आहे.