दोन अट्टल चोरटे नवीन कामठी पोलिसांच्या जाळ्यात

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

– दोन लाख 9 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

कामठी :-  नवीन कामठी पोलीस ठाण्या हद्दीतील दोन दिवसापूर्वी नया गोदाम परिसरातील घरफोडी प्रकरणात नवीन कामठी पोलिसांनी दोन अट्टल चोरट्यांना अटक करून त्यांचे जवळून दोन लाख 9 हजार 300 चा मुद्देमाल जप्त केल्याची कारवाई शनिवारला दुपारी दोन वाजता सुमारास केली. नवीन कामठी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार प्रमिला चिंतामण यलगुटवार वय 28 राहणार नया गोदाम ह्या 31 ऑक्टोबर 2023 ला आपल्या कुटुंबासह नागपूर येथील नातेवाईकाकडे गेले असता आरोपी विशाल उर्फ नॉटी राजाराम कुशवा वय 19 राहणार नया गोदाम कामठी ,मोहम्मद शोएब उर्फ सोहेल मोहम्मद अरिफ वय 30 राहणार खुशबू मोटर जवळ येरखेडा यांनी घरा मागचे दार तोडून बेडरूम मध्ये प्रवेश करून बेडरूम मधील कपाट फोडून कपाटातील नगदी 2100 रुपये व सोन्या-चांदीचे दागिने एकूण दोन लाख नऊ हजार तीनशे रुपयांचा मुद्देमाल घेऊन पसार झाले होते दुसरे दिवशी सकाळी दहा वाजता प्रमिला चिंतामण येलगुटवार यांना त्यांचे घरी चोरी झाल्याची माहिती झाली असता ते घरी येऊन बेडरूमची पाहणी केली असता त्यांना दोन लाख 9 हजार 300 रुपयांचा माल चोरी गेल्याचे उघड किस झाले त्यांनी नवीन कामठी पोलीस स्टेशनला चोरी झाल्याची तक्रार केली पोलिसांनी कलम 354 ,380 नुसार गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध सुरू केला असता सराईत आरोपी विशाल उर्फ नाडी राजाराम कुशवाह वय 19 ,,मोहम्मद शोएब उर्फ सोहेल मोहम्मद अरिफ वय 30 राहणार खुशबू मोटर जवळ येरखेडा या दोघांनी चोरी केल्याची माहिती पोलिसांना मिळाली असता पोलिसांनी दोन्ही आरोपींना शनिवारला दुपारी एक वाजता सुमारास त्यांचे घरून अटक करून त्यांचे जवळून चोरीस गेलेला मुद्देमाल सोन्या– चांदीचे दागिने, व नगदी एकूण दोन लाख 9 हजार 300 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून दोन्हीही सराईत चोरीचे गुन्हेगार असून त्यांचे जवडून अजून काही चोरीचे गुन्हे उघडकिस येनार असल्याचे ठाणेदार प्रमोद पोरेरे यांनी सांगितले आहेत वरील कारवाई पोलीस उपायुक्त श्रवण दत्त, ठाणेदार प्रमोद पोरे यांचे मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक दीपक पवार ,अतुल बाळराजे, विशाल मेश्राम,सुरेंद्र शेंडे ,नसीम अन्सारी ,राहुल वाघमारे, विशाल पवनीकर यांच्या पथकाने केली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

अंबाझरी तलावाच्या बळकटीकरणासाठी 32.42 कोटी मंजूर

Sun Nov 5 , 2023
– क्षतिग्रस्त नदी, नाले, पूल, रस्त्यांसाठी 234.21 कोटी – 266.63 कोटी रुपयांत पूर्ण करणार सर्व कामे – नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस यांची घोषणा नागपूर :- नागपूर शहरात 22 सप्टेंबर 2023 रोजी आलेल्या ढगफुटीसदृश्य पावसानंतर भविष्यात पुन्हा इतका पाऊस झाल्यास नागरिकांना त्रास होऊ नये, म्हणून अंबाझरी तलावाच्या बळकटीकरणासाठी 32.42 कोटी रुपये मंजूर करण्यात आले असून याशिवाय, क्षतिग्रस्त नदी, नाले, पूल आणि […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com