– मुद्देमालासह लोहमार्ग पोलिसांच्या सुपूर्द
– सीसीटीव्ही फुटेजने पटविली ओळख
नागपूर :- आरपीएफच्या पथकाने अवघ्या तीन तासात दोन मोबाईल चोरास पकडले. या दोघांनीही नागपूर रेल्वे स्थानकाहून प्रवाशांचे मोबाईल चोरले. सीसीटीव्ही फुटेज तपासणीत त्यांची ओळख पटली. आरपीएफच्या पथकाने छायाचित्राच्या आधारे दोघांच्याही मुसक्या आवळल्या.
राहूल साहू (29) रा. रायपूर असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. त्याने प्लॅटफार्म क्रमांक 8 वरून एका प्रवाशाचा मोबाईल चोरला. प्रवीण भगत असे फिर्यादीचे नाव आहे. प्रवीणच्या तक्रारीवरून लोहमार्ग पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली. सीसीटीव्ही नियंत्रण कक्षात फुटेज तपासनीत आरोपीची ओळख पटली. शोध घेवून त्याला पकडण्यात आले. त्याच्या ताब्यातून एक मोबाईल आणि 2 हजार 400 रूपये जप्त करण्यात आले. पुन्हा एक चोरीचा मोबाईल मिळाला. गोंदिया रेल्वे स्थानकाहून चोरी केल्याचे सांगितले. आरोपीला लोहमार्ग पोलिसांच्या सुपूर्द करण्यात आले. ही कारवाई नितिन देवर, कुंदन फूटने, नीरज कुमार यांनी केली. आरोपीला लोहमार्ग पोलिसांच्या सुपूर्द करण्यात आले.
दुसर्या कारवाईत चार्जिंगवर ठेवलेला मोबाईल चोरी करणार्यास आरपीएफच्या पथकाने पकडले. त्याच्या ताब्यातून चोरीचा मोबाईल जप्त करण्यात आला. आकाश साहू (28) रा.राजनांदगांव असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.
चंद्रपूर येथील रहिवासी फिर्यादी प्रकाश पेंदाम (30) नागपूर रेल्वे स्थानकाच्या जनरल वेटींग हॉलमध्ये होते. दरम्यान त्यांनी मोबाईल चार्जिंगवर ठेवला आणि जवळच बसले. लक्ष विचलित होताच आकाशने मोबाईल चोरला. प्रकाशने लोहमार्ग ठाण्यात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून सीसीटीव्ही फुटेज तपासले असता आकाश संशयास्पद आढळला. उपनिरीक्षक कुंदन फुटाणे आणि निरज कुमार यांनी जनरल वेटींग हॉलमध्ाून आकाशला पकडले. कायदेशीर कारवाईनंतर त्याला लोहमार्ग पोलिसांच्या सुपूर्द करण्यात आले.