नागपूर :- शासकीय मुलांचे अनुरक्षण गृह येथे जिल्हा महिला बाल विकास अधिकारी कार्यालय जिल्हा बाल संरक्षण कक्ष व मिरॅकल इंडिया फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 24 व 25 नोव्हेंबर रोजी बालगृहामध्ये मुलांची काळजी घेण्यासाठी नियुक्त काळजीवाहकांचे दोन दिवसीय प्रशिक्षण घेण्यात आले. प्रशिक्षणामध्ये मुलांची काळजी कशी घ्यायची मुलांचे समस्या समजून घेणे मुलांच्या वाढत्या वयामध्ये होणारे बदल किशोरवयीन मुलांच्या, मुलींच्या समस्या त्यांना जीवनात येणाऱ्या अडी अडचणी कशा हाताळायच्या याबाबत तज्ज्ञाद्वारे प्रशिक्षण देण्यात आले.
दोन दिवसीय प्रशिक्षणामध्ये मुख्य मार्गदर्शक म्हणून पुनम जुनघरे सायकॉलॉजिस्ट आसमी कौन्सिलिंग सेंटर पुणे हे उपस्थित होत्या या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा महिला बाल विकास अधिकारी भारती मानकर अध्यक्ष बालकल्याण समिती छाया गुरव अधीक्षक बी एन चिंचाने अधीक्षक नम्रता चौधरी जिल्हा बाल संरक्षण अधिकारी मुस्ताक पठाण हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन संरक्षण अधिकारी साधना ठोंबरे यांनी केले.