पारशिवनीत दत्त टेकडी येथे आज पासुन दोन दिवसीय दत्तात्रय प्रभू अवतार दिन महोत्सव 

12 व13 डिसेंबर दोन दिवसीय यात्रा महोत्सव सोहळ्याचे आयोजन.

पारशिवनी :- दत्तात्रय प्रभू हे पूर्ण परब्रह्म परमेश्वर अवतार आहेत. दत्तात्रय प्रभूंच्या जीवन उद्धारण कार्याची व विचारांची सामान्यांना ओळख होणे काळाची गरज आहे. त्याच उदात्त हेतूने दत्त मंदिर सेवाभावी ट्रस्ट पारशिवनीच्या वतीने अवतार दिन यात्रा महोत्सवाचे आज पासुन शुरू होणार आल्याची माहिती ट्रस्ट्री सुधाकर मेंघर यांनी दिली.

श्री दत्तात्रय प्रभू अवतार दिन यात्रा महोत्सव आज १२ व उद्या १३ डिसेंबर २०२२ रोजी होणार आहे. महोत्सवाचा शुभारंभ आज सकाळी ७ वाजता नामस्मरण, देवास मंगल स्नानाने होईल. त्यानंतर विविध धार्मिक कार्यक्रम अर्तगत आरती देव पुजा तपस्वीनी आशा ताई कपाटे, तपस्वीनी कोमलताई कपाटे याचे हस्ते होणार तर दिवसभर चालणार तर संत महंता चे प्रवचन सुश्रवास्व किर्तन होणार. रात्री भजनाचे आयोजन केले जाणार आहे. उद्या मंगलवारी १३ डिसेंबर रोजी सकाळी दीपकराज बांधकर व योगेश कपाटे यांचे गीतापाठ पारायण होईल.

सकाळी८ वाजता ३५ गावातील भजन मंडळ यांत टेभुर डोह, चांपा, पारशिवनी, करभाड , बखारी, निबा, दहेगाव जोशी, सावळी, खंडाळा, पारडी, इटगाव, दिगलवाडी, रोहणा, पाळा सावळी, सोनेगाव, हिंगणा, भागीमहारी, साहोली, सि गोरी, डोरली, वाघोडा, गवना, गरंडा, पालोरा, गुदरी, बाबुलवाडा , सालई, कोथुडना, आमगाव, माहुली, नयाकुंड, मेहंदी सह अनेक गावातील महिला पुरुष भजन मडळ सहभागी पालखी मध्य शामिल होणार , नतर दुपारी १वाजता धर्मसभा होईल. यावेळी आचार्य मुधोव्यास उपाख्य संजयराज शास्त्री, महंत बांधकर बाबा, महंत शिवनेकरबाबा, महंतअचलपूरकर बाबा, मायराजबाबा कारंजेकर, सनातनमुनी बिडकर,भाविकराज येळमकर, दत्तराज बांधकर बाबुदादा तळेगावकर, तपस्विनी प्रतिभा पंजाबी यांच्या प्रमुख उपस्थितीत धर्मसभा आणि यांचे कीर्तन होणार आहे. कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून पुरुषोत्तम ठाकरे, गंगाधर निकम, नरेंद्र आमधरे, विजय भरबत, रवींद्र तिखे, हरिहर पांडे उपस्थित राहतील. शेवटी महाप्रसाद चा आयोजन करण्यात आले असून पारशिवनी दत्त टेकडी येथील दत्तप्रभू अवतार दिन सोहळा यशस्वी व्हावा याकरिता महंत कृष्णराजबाबा कपाटे, दीपकराज बांधकर यांच्या मार्गदर्शनाखाली दत्त मंदिर सेवाभावी ट्रस्ट पारशिवनी येथील ट्रस्टी सुधाकर मेंघर, राहुल मेंघर, संदीप मेंघर. जगदीश मोहोड सचिव. गंगाधर काकडे उपाध्यक्ष. यांच्यासह सर्व टूस्टी सदस्य अथक परिश्रम घेत आहेत.

श्री दत्तात्रेय प्रभू अवतार दिन यात्रा महोत्सवात भाविकांनी मोठय़ा संख्येने सहभागी व्हावे असे आव्हान श्री दत्त मंदिर सेवाभावी ट्रस्ट पारशिवनी च्या वतीने करण्यात आले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

VIA & Income Tax (TDS) Circle-1 & 2, Nagpur jointly Interactive Session on “Common issues in TDS” on 15th Dec at VIA

Mon Dec 12 , 2022
Nagpur :-VIA Taxation & Corporate Law Forum & Income Tax (TDS) Circle-1 & 2, Nagpur are jointly organising an Interactive Session on “Common issues in TDS” on Thursday, 15th December 2022 from 4.00 pm to 5.30 pm at VIA Auditorium, Udyog Bhawan, Civil Lines, Nagpur.Hon’ble Chief Guest will be Mahua Sarkar, Commissioner CIT (TDS), Nagpur and Guests of honours – […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com