Ø तक्रार अर्ज तातडीने निकाली काढण्याचे विभागीय आयुक्तांचे आदेश
नागपूर :- विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित लोकशाही दिनात आज दोन तक्रार अर्ज प्राप्त झाले असून संबंधीत तक्रारी तातडीने निकाली काढण्याचे आदेश विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी दिले आहेत.
बिदरी यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले. यावेळी सामान्य प्रशासन उपायुक्त प्रदीप कुलकर्णी, संबंधीत विभाग प्रमुख यावेळी उपस्थित होते. तक्रारदारांकडून बिदरी यांनी तक्रारी जाणून घेतल्या. पुढील कार्यवाहीबाबत तक्रारदारांना मार्गदर्शन केले. या दोन्ही तक्रार अर्जांवर तातडीने कार्यवाही करुन हे प्रकरणे निकाली काढण्याचे आदेश बिदरी यांनी संबंधीत विभागांना दिले.