नागपूर, औरंगाबादचे दोन उमेदवार नॉट रिचेबल; महाविकास आघाडीला झटका बसणार? 

नागपूर : नाशिक पदवीधर मतदारसंघातली उमेदवार शुभांगी पाटील यांचा नंबर नॉट रिचेबल येत असल्याने राजकीय वर्तुळात खळबळ माजलेली आहे. ही घटना ताजी असतानाच दुसरी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. नागपूर आणि शिक्षक मतदारसंघातील राष्ट्रवादीचे दोन उमेदवार नॉट रिचेबल असल्याचं वृत्त आहे. नागपूरचे उमेदवार सतिश इटकेलवार आणि औरंगाबादचे प्रदीप साळुंखे हे सुद्धा नॉट रिचेबल असल्याचं वृत्त आल्याने खळबळ उडाली आहे.

नागपूर शिक्षक मतदारसंघातून राष्ट्रवादीचे उमेदवार सतिश इटकेलवार हे उभे होते. त्यांनी उमेदवारी अर्जही भरला होता. मात्र, त्यांचा नंबरही सकाळपासून नॉटरिचेबल येत असल्याने अनेक तर्कवितर्क व्यक्त केले जात आहेत. इटकेलवार नेमके कुठे गेले? असा सवाल या निमित्ताने केला जात आहे. आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. अर्ज मागे घेण्यासाठी अवघे दोन तास उरले आहेत. त्यापूर्वीच इटकेलवार गायब झाल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

औरंगाबाद शिक्षक मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार प्रदीप साळुंखे हे सुद्धा नॉट रिचेबल आहेत. त्यामुळेही आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. राष्ट्रवादीचे दोन्ही उमेदवार अचानक नॉट रिचेबल झाले आहेत. ते कुणासोबत आहेत? कुठे आहेत? याचा काहीच थांगपत्ता लागताना दिसत नाहीये. त्यामुळे अनेक राजकीय तर्कवितर्क लढवले जात आहेत.

हे दोन्ही उमेदवार अर्ज मागे घेण्यापूर्वीच समोर येणार की अर्ज भरण्याची मुदत संपल्यानंतर समोर येणार हे अद्याप गुलदस्त्यात आहे. विरोधकांचे उमेदवार फोडण्यासाठी भाजपने जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीने आपल्या उमेदवारांना अज्ञातस्थळी हलवलं तर नाही ना? असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.

दरम्यान, नाशिक पदवीधर मतदारसंघातील ठाकरे गटाच्या उमेदवार शुभांगी पाटील या सुद्धा कालपासूनच नॉट रिचेबल आहेत. त्यांचाही फोन लागत नाहीत. त्या कुणासोबत आहेत त्याचीही माहिती मिळत नाही. विशेष म्हणजे मंत्री आणि भाजप नेते गिरीश महाजन कालपासून नाशिकमध्ये तळ ठोकून आहेत. अपक्षांनी माघार घ्यावी आणि सत्यजित तांबे यांचा विजय सोपा व्हावा या प्रयत्नात ते आहेत.

@ फाईल फोटो

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

सत्यजित तांबे यांना पक्षातून निलंबित करा, थेट दिल्लीतून आदेश; हायकमांड काय म्हणाले? 

Mon Jan 16 , 2023
मुंबई: नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत बंडखोरी करणं काँग्रेस नेते सत्यजित तांबे यांच्या अंगलट येणार असल्याचं दिसत आहे. सत्यजित तांबे यांना पक्षातून निलंबित करा, अशा सूचनाच काँग्रेस हायकमांडने दिल्याचं सूत्रांनी सांगितलं. त्यामुळे सत्यजित तांबे यांना कोणत्याही क्षणी निलंबित करण्यात येणार असल्याचं दिसत आहे. दरम्यान, कालच सत्यजित तांबे यांचे वडील आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डॉ. सुधीर तांबे यांना पक्षातून निलंबित करण्यात आलं […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com