संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कन्हान : – अंतर्गत ०.५ कि.मी. अंतरावर तारसा चौक कन्हान येतील महाकाली कॉम्पलेक्सच्या वरती १५/२० चे असे दोन जाहीरात होल्डींग लावण्यात आले होते. होल्डींग ला वापरण्यात आलेले लोंखडी एंगल, चँनल, नट बोल्ट असा एकुण ३,३०,३६४ रूपये चा मुद्देमाल अज्ञात आरोपीने चोरून नेल्याने पोस्टे कन्हान येथे चोरी चा गुन्हा दाखल करून आरोपी चा शोध सुरू आहे.
तारसा चौक कन्हान येतील महाकाली कॉम्पले क्सच्या वरती १५/२० चे असे दोन जाहीरात होल्डींग लावण्यात आले होते. त्यात वापरण्यात आलेले लोंख डी १) सी चॅनल हेवी वेट १३८ किलो प्रत्येकी वजनाचे १२ नग प्रती किलो ५३.५० रू. प्रमाने किंमत ७२०३६ रू, २) ५५/५ एंगल २० फुट लांब ११८ किलो वजना चे १८ नग प्रती किलो ४२.५० किंमत १४०४८० रू. ३) ४५/५ एंगल २० फुट ९८ किलो वजनाचे २२ नग प्रती किलो ५३ रु. किंमत ९२,७०८ रू. ४) ६५/५ एंग ल २० फुट १२८ किलो वजनाचे १४ नग प्रती किलो ५२.५० रू. किंमत ७६,१६० रु. ५) डबल वार ३ मीट बोल्ट ३० किलो वजनाचे किमती ३२ रू. प्रमाणे किमं त ९६० रू. ६) जी बलेम १२ किलो वजनाचे किमत ९० रू. प्रमाणे किंमत १०८० रू. असा वरील सर्व मालाची एकुण किंमत ३,८३,३६४ रू. ऐवढी होती. त्यापैकी १० एंगल वाचले किंमत ५३,००० रू. चा माल वाचला व ३,३०,३६४ रूपये चा मुद्देमाल (दि.३) ऑगस्ट चे रात्री ११ वाजता ते (दि.४) चे सकाळी ९ वाजता दरम्यान अज्ञात आरोपीने चोरून नेल्याने सदर फिर्यादी यांच्या तक्रारीने पो.स्टे. कन्हान येथे अज्ञात आरोपी विरुध्द कलम ३७९ भादंवि कायद्यान्वये गुन्हा नोंद केला असुन कन्हान पोस्टे चे पोहवा खुशाल रामटेके हे पुढील तपास करित आरोपीचा शोध घेत आहे.