नागपूर :- लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 करीता निवडणूक आयोगाने मतदान करण्यापूर्वी मतदारांची ओळख पटविण्याकरीता मतदान ओळखपत्रासह (EPIC) 12 प्रकारचे ओळखीचे पुरावे ग्राह्य धरलेले आहे.
नागपूर आणि रामटेक लोकसभा क्षेत्रात 19 एप्रिलला मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी स्वतःची ओळख पटविण्याकरीता निवडणूक आयोगाने बारा प्रकारचे ओळखीचे पुरावे ग्राह्य धरले आहे. त्यामुळे आता लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीत मतदान करतांना मतदारांची ओळख पटविणे शक्य होणार आहेत. या ओळखपत्रात आधार कार्ड, मनरेगा जॉब कार्ड, बँक व पोस्ट ऑफिसने जारी केलेल्या फोटोसह पासबुक, कामगार मंत्रालयाच्या योजनेअंतर्गत जारी केलेले आरोग्य विमा स्मार्ट कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, पॅन कार्ड, कामगार मंत्रालयाने जारी केलेले स्मार्ट कार्ड, भारतीय पासपोर्ट, छायाचित्रासह पेन्शन दस्तऐवज, केंद्र व राज्य सरकार / पीएसयू / पब्लिक लिमिटेड कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना दिलेली छायाचित्र असलेली सेवा ओळखपत्रे, खासदार, आमदार यांना जारी केलेल्या अधिकृत ओळखपत्रांचा समावेश आहे. यामुळे लोकसभा निवडणुकीत मतदारांना मतदान करताना कोणतीही अडचण येणार नाही. ते आपला मतदानाचा हक्क बजावू शकतील.
@ फाईल फोटो