– अपुर्ण पथ दिवे पुर्ण करा
– रेलिंग च्या बांधकामाची मागणी
– सर्व्हिस रोडलगत ड्रेनेज बांधण्याची मागणी
– आंदोलनाचा इशारा
काटोल/कोंढाळी :- नागपुर -अमरावती एशियन हायवेज तसेच राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३(६) वरिल नगर पंचायत कोंढाळीच्या मधोमध नागपूर-अमरावती आशियाई महामार्ग 46 व राष्ट्रीय महामार्ग 53 (6) या चौपदरी रस्त्याचे बांधकाम करण्यात आले आहे. येथील बांधकाम सुरू असलेल्या चौपदरी रस्त्यासाठी रस्ता दुभाजक करण्यात आले असून, स्थानिक नगर पंचायत कोंढाळी भागातून मधोमध असलेल्या राष्ट्रीय महामार्गाच्या दुभाजकात बसविलेले पथदिवे व लोखंडी रेलिंगचे बांधकाम अपूर्ण अवस्थेत आहे.
कोंढाळी नगर पंचायत हद्दीतील हद्दीतील चौपदरीकरणाचे बांधकामात बसविण्यात आलेले पथदिवे मागील दिड महिन्या पासून बंद आहेत. महामार्गावरील बंद असलेले पथ दिवे पुर्ववत सुरू करावे.या भागातील लोखंडी रेलिंगचे काम अपूर्ण आहे. अपूर्ण रैलिंग पन्नास किलो मिटर सीमे पर्यंत पुर्ण करण्यात यावी तसेच कोंढाळी- वर्धा टी पॉईंट वर पांढरे पट्टे न लावल्याने अपघातांची मालिका सुरू आहे. करीता येथे योग्य उपाय योजना करण्यात यावी. या सर्व आवश्यक समस्या सोडविण्यासाठी राष्ट्रीय काँग्रेस (एसपी) जिल्हा उपाध्यक्ष स्वप्नील व्यास,राका(एस.पी.) शहराध्यक्ष संजय राऊत, कमलेश गुप्ता,भा ज प चे जिल्हा युवा मोर्चाचे सदस्य बबलू बिसेन, राका (एसपी) विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष आकाश गजबे, नितीन ठवळे, अफसर हुसेन, प्रशांत खंते,विनोद माकोडे,उत्तम गिरडकर, काटोल पंचायत समिती चे माजी सभापती योगेश चाफले,भाजपचे शामराव तायवाडे, प्रमोद धारपुरे, राका (ए पी) तहसील अध्यक्ष विवेक चिचखेडे, राका
(एसपी) प्रज्वल धोटे, रजा पठाण, भा ज प माजी भाजप शहराध्यक्ष बालकिसन पालीवाल, माजी सरपंच केशवराव धुर्वे, नरेश राऊत, नरेश सेंगर,गौरव ठवळे,वैभव लाड,आयुष्मान पांडे, मोहित सेंगर, गुप्ता,परिमल हिंगणकर, राजा बेग, रोहित गोलाईत, दुर्गा प्रसाद पांडे,कुणाल भांगे, विकास कामडी, प्रमोद आष्टणकर,बाबाराव माळोदे , गणेशराव शिरभाते, महेंद्र धर्मे,व स्थानिक युवकांनी शहराच्या हद्दीपर्यंतच्या रस्ता दुभाजकांवर पथदिवे बसवावेत, अशी मागणी तरुणांनी केली. तसेच विकास नगर लगत बांधण्यात आलेल्या ड्रेनेज चे बांधकाम देखील अपूर्ण व अतिशय जीर्ण अवस्थेत आहे, त्याची दुरुस्ती करावी. तसेच महामार्गाच्या सर्व्हिस रोडच्या दोन्ही बाजूला ड्रेनेज (गटारा)चे काम न केल्याने महामार्गावरून वाहत असलेल्या पावसाचे पाणी येथील पोलीस ठाण्याच्या परेड ग्राऊंडवर भरते, त्यामुळे येथील सर्व्हिस रोडवरिल पाणी तुंबते.या करिता ड्रेनेजच्या बांधकामाची मागणी करण्यात आली आहे.
आंदोलनाचा इशारा
कोंढाळी नगर पंचायत सीमे अंतर्गत महामार्गाचे दुभाजकांचे मधील बंद पथ दिवे पुर्ववत सुरू करावे. तसेच अन्य मागण्यांबाबत कार्यवाही करण्यात यावी. अन्यथा आंदोलन हाच एक मार्ग शिल्लक आहे. अशी माहिती प्रज्वल धोटे यांनी दिली आहे.