– धरमपेठ झोन आयुक्तांना निवेदन
नागपूर :- शहरात बऱ्याच ठिकाणी ई- टाॅयलेट्स उभारण्यात आलेत पण ती बंद पडलेली आहेत. व नागरिकांना याचा वापर करता येत नाही आहे. नागरिकांना प्रवास करताना अतिशय त्रास सहन करावा लागत आहे. स्मार्ट सिटी च्या नावाखाली शहरात सौदंर्यीकरण करण्यात येत आहे. तर दुसरीकडे लोक रस्त्यावर घाण करताय. तरी प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देउन लवकरात लवकर शहरातील ई- टाॅयलेट्स चालु करण्यात यावे म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेना तर्फे मनसे शहर अध्यक्ष चंदू लाडे व विशाल बडगे यांच्या मार्गदर्शनात महिला सेनेच्या विभाग अध्यक्षा रचना गजभिये यांच्या नेतृत्वात धरमपेठ झोन मनपा विभागातील सहाय्यक आयुक्त प्रकाश वराडेना निवेदन देण्यात आले व चर्चा करण्यात आली.
निवेदनाचे गांभीर्य ओळखून सहाय्यक आयुक्त यांनी याबाबत लगेच कारवाई करू असे आश्वासन मनसे सेनेच्या शिष्टमंडळाला दिले.याप्रसंगी अर्चना सोमकुवर, पद्मा नंदेश्वर, सागर कोठेकर, अभिषेक डे व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.