मंगळवारी ५०० प्लास्टिक पतंगे जप्त

-३ प्रतिष्ठानांवर उपद्रव शोध पथकाची कारवाई

नागपूर : नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने मंगळवारी (ता. २८ डिसेंबर)  रोजी प्लास्टिक पतंगच्या विरोधात कारवाई करीत  ५०० प्लास्टिक पतंग जप्त केली. या कारवाईत १०,०००/- रुपये दंड वसूल करण्यात आला. उपद्रव शोध  पथकाद्वारे लक्ष्मीनगर झोनमधील ७ पतंग दुकानांची तपासणी करुन ५०० प्लास्टिक पतंग जप्त करण्यात आले. शोध पथकाने १० झोन मध्ये ५७ दुकानांची तपासणी केली.

            याशिवाय उपद्रव शोध पथकाने ३ प्रतिष्ठानांवर कारवाई करुन रु. १५,००० चा दंड वसूल केला. पथकाने ४२ प्रतिष्ठाने व मंगल कार्यालयांची तपासणी केली. मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्या निर्देशानुसार उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली झोन शोध पथकांद्वारे ही कामगिरी पार पाडण्यात आली

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

News Today 24x7

Next Post

शहरातील 10 सार्वजनिक स्वच्छतागृहात लागणार 5 रुपये सेवाशुल्क; मनपाच्या स्थायी समिती बैठकीत मंजुरी

Wed Dec 29 , 2021
चंद्रपूर: शहर महानगरपालिकेच्या झोन क्रमांक एक, दोन आणि तीन अंतर्गत 29 शौचालये सार्वजनिक आहेत. यातील दहा सार्वजनिक शौचालये “पे अँड युज” तत्त्वावर चालवण्यासाठी मनपाच्या विचाराधीन होते. त्यातील दहा स्वच्छतागृहांमध्ये प्रति शौचविधीकरिता पाच रुपये शुल्क आकारणीला स्थायी समिती बैठकीत मंजुरी देण्यात आली. स्थायी समिती सभापती संदीप आवारी यांच्या अध्यक्षतेखाली 28 डिसेंबर रोजी स्थायी समिती सभागृहात बैठक पार पडली. यावेळी सर्व समिती सदस्यांची उपस्थिती होती. […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com