स्पर्धा परीक्षा देऊन आपले ज्ञान बळकट करावे-मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर..

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी ता प्र :- आज आपण स्पर्धेच्या तसेच संगणकीय युगात वावरत आहोत .प्रत्येक क्षेत्रात स्पर्धा वाढलेली आहे.तेव्हा स्पर्धात्मक परीक्षेच्या अभ्यासाकडे कल वाढवून स्पर्धापरिक्षांचा अभ्यासक्रम,अभ्यासाचे विहित मर्यादेत नियोजन ,कॅलेंडरच्या मदतीने अभ्यासाचे वेळापत्रक तयार करणे,नोट्स काढण्याची सवय,केलेल्या अभ्यासाची वारंवार उजळणी करून आपले दोष आपणच शोधण्याची सवय कशी लावावी याबाबत योग्य ते मार्गदर्शन करीत स्पर्धा परीक्षा देऊन आपले ज्ञान बळकट करावे असे आवाहन जिल्हा परिषद नागपूर चे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर यांनी केले

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परिक्षाविषयो मार्गदर्शन मिळावे या संकल्पनेतुन कामठी पंचायत समिती च्या गटविकास अधिकारी अंशुजा गराटे यांनी 8 ऑक्टोबर ला कामठी पंचायत समिती सभागृहात आयोजित स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळेत ते बोलत होते.या कार्यशाळेस प्रमुख मार्गदर्शक म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर,अति मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ कमलकिशोर फुटाणे,नाथें पब्लिकेशन नागपूर चे संजय नाथें,नागपूर उपजिल्हाधिकारी पियुष चिवंडे, गुन्हे शाखा नागपूर चे एसीपी रोशन पंडित, पोलिस उपअधीक्षक पूजा गायकवाड प्रामुख्याने उपस्थित होते.

कार्यशाळेस आलेले सर्व मार्गदर्शक ग्रामीण भागातील पाश्वरभूमी लाभलेले असून अपयश आले तरी जीवनात प्लान बी ही तयार असावा ,अपयशाने खचुन न जाता शून्यातुन सुरुवात करून नवीन संधी स्वतःकडे कशा अजून ओढून घ्याव्यात याकडे लक्ष देण्याबाबत मर्गदर्शकांनी विद्यार्थ्यांना मौलिक असे मार्गदर्शन केले.दरम्यान डॉ कमलकिशोर फुटाणे यांनी स्पर्धा परिक्षाची दशसूत्री सांगून विद्यर्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण केले यावेळी त्यांनी स्पर्धा परीक्षा विषयी ग्रामीण भागातील विद्यर्थ्यामधील स्पर्धा परीक्षांकडे बघण्याचा दृष्टिकोन ,न्यूनगंड इत्यादी कडे लक्ष वेधले.यासह उपस्थित मर्गदर्शकांनी मौलिक असे मार्गदर्शन केले यावेळी बीडीओ अंशुजा गराटे यांनी संपन्न झालेल्या या कार्यशाळेतून किमान 2 ते 5 विद्यार्थी प्रशासकीय सेवेत येतील तर समाधान लाभेल असा मानस यावेळी व्यक्त केला.या कार्यशाळेत 100 च्या जवळपास विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता तर विशेष म्हणजे सदर कार्यशाळेस तालुक्यातील कढोली ग्रा प च्या सरपंच प्रांजल वाघ यांनी आपल्या गावातील विद्यार्थ्यांसह स्वता उपस्थित राहल्या. यावेळी शैक्षणिक विकास याबाबत गावातील सरपंचाचा वाढता प्रतिसाद याबाबतही प्रचिती आली.

कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला असुन संचालन जिल्हा परिषद नागपूर स्वच्छ भारत मिशन चे मासुरकर यांनी केले तर प्रास्ताविक बीडीओ अंशुजा गराटे यांनी केले तर आभारप्रदर्शन सहाययक गटविकास अधिकारी प्रदीप गायगोले यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पंचायत समिती चे समस्त अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मोलाची भूमिका साकारली.

Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com