नागपूर :- नागपूर महानगरपालिकेच्या अग्निशमन व आणिबाणी सेवा विभागामार्फत आयोजित विविध वार्षिक स्पर्धांमधील मिडले ड्रिल स्पर्धेमध्ये त्रिमूर्तीनगर अग्निशमन केंद्र आणि मनपा मुख्यालय सिव्हिल अग्निशमन केंद्राने अनुक्रमे ‘अ’ आणि ‘ब’ गटात प्रथम स्थान पटकाविले. मनपा मुख्यालय परिसरात घेण्यात आलेल्या स्पर्धेतील विजेत्यांचे आणि सहभागी अधिकारी कर्मचा-यांचे मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांनी अभिनंदन केले.अग्निशमन व आणिबाणी सेवा विभागामार्फत ८ व ९ एप्रिल रोजी वार्षिक विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये सांघीक मिडले ड्रिल व व्यक्तीगत लॅडर ड्रिल स्पर्धा घेण्यात आली. यामध्ये सर्व अग्निशमन केंद्रामार्फत मिडले ड्रिल स्पर्धेकरीता प्रत्येकी ०२ संघाने भाग घेतला. मिडले ड्रिल स्पर्धेचे ‘अ’ आणि ‘ब’ असे दोन गट करण्यात आले. ‘अ’ गटात सर्वात कमी ५९.६६ मिनिट वेळ नोंदवून त्रिमूर्तीनगर अग्निशमन केंद्राने बाजी मारली. तर द्वितीय क्रमांक लकडगंज अग्निशमन केंद्र (०१.००.०० मि.) आणि तृतीय क्रमांक सिव्हिल अग्निशमन केंद्र यांनी (०१.०६.०० मि.) पटकाविला.
‘ब’ गटातील मिडले ड्रिल स्पर्धेत मुख्यालय सिव्हिल अग्निशमन केंद्राने (०१.००.०० मि.) प्रथम क्रमांक पटकाविला. तर त्रिमूर्तीनगर अग्निशमन केंद्राने (०१.०१.०० मि.) द्वितीय क्रमांक आणि सिव्हिल अग्निशमन केंद्राने (०१.०४.०० मि.) तृतीय क्रमांक प्राप्त केला. मुख्य अग्निशमन अधिकारी राजेन्द्र उचके यांच्या मार्गदर्शनात स्पर्धा घेण्यात आली.
याशिवाय व्यक्तीगत लॅडर ड्रिल स्पर्धेमध्ये सर्व अग्निशमन केंद्रामधील एकूण ३७ अधिकारी व कर्मचारी यांनी भाग घेतला. या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक राजू पवार अग्निशमन विमोचक कळमना अग्निशमन केंद्र (००.२८.०० मि.), द्वितीय क्रमांक सुरेश आत्राम, प्र.उप. अग्निशमन अधिकारी, त्रिमुर्तीनगर अग्निशमन केंद्र (००.२९.००), तृतीय क्रमांक अंकीत देशमुख कंत्राटी अग्निशमन विमोचक, नरेंद्रनगर अग्निशमन केंद्र (००.३०.६५), चतुर्थ क्रमांक प्रसाद बावणकर, कंत्राटी अग्निशमन विमोचक, सिव्हिल अग्निशमन केंद्र (००.३०.९२) आणि पाचवा क्रमांक ओवेश पठाण, कंत्राटी अग्निशमन विमोचक, सुगतनगर अग्निशमन केंद्र (००.३१.२६) यांनी पटकाविला.