मनपातर्फे निघणार तिरंगा रॅली

चंद्रपूर :- माझी माती माझा देश व हर घर तिरंगा अभियानातंर्गत चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे शनिवार १२ ऑगस्ट रोजी सकाळी ८ वाजता तिरंगा रॅली काढली जाणार असुन जिल्हाधिकारी विनय गौडा यांचा हस्ते सदर रॅलीस हिरवी झेंडी दाखविली जाणार आहे.

भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त मनपातर्फे विविध कार्यक्रम घेतल्या जात आहेत. तिरंगा रॅलीद्वारे नागरिकांच्या मनात देशभक्ती जागृत करणे हा अभियानाचा उद्देश आहे. या वर्षी सुद्धा स्वातंत्र्य दिन घरोघरी तिरंगा फडकवून मोठया उत्साहात अणि आनंदात साजरा केला जाणार आहे.या उपक्रमाअंतर्गत जिल्हाधिकारी विनय गौडा व आयुक्त विपीन पालीवाल यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवुन रॅलीस प्रारंभ केला जाणार आहे.

शहरातील छोटुभाई पटेल शाळा,एफईएस गर्ल्स ,सिटी कन्या,हिंदी सिटी, सिटी माध्यमिक लोकमान्य टिळक विद्यालय,लोकमान्य शाळा,न्यू इंग्लीश,किदवई तसेच नूतन माध्यमिक अश्या १० शाळा या रॅलीत सहभागी होणार आहेत. शाळेतील मोठ्या मुलांचा रॅलीत सहभाग राहणार असुन ही सर्व मुले हातात राष्ट्रध्वज धरून मनपा कार्यालय गांधी चौक येथुन आझाद बगीचापर्यंत मार्गक्रमण करणार आहेत. आझाद बगीचा येथे रॅलीचा समारोप होणार असुन त्यानंतर हातात माती घेऊन पंचप्रण शपथ घेतली जाणार आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

नोटिस के अनुसार कार्रवाई के लिए NIT स्वतंत्र, संगम चॉल मामले में हाई कोर्ट ने दिया आदेश 

Fri Aug 11 , 2023
नागपुर :- बर्डी स्थित संगम चॉल की दूकान धारकों को नागपुर सुधार प्रन्यास ने वर्ष 1981 से लेकर 2002 के बीच अलग-अलग नोटिस तो जारी किए किंतु इसके बाद अवैध निर्माण को हटाने के लिए किसी तरह की कार्रवाई नहीं की. इसे लेकर जयंत बूटी एवं अन्य ने हाई कोर्ट में वर्ष 2010 में याचिका दायर की. इस पर सुनवाई […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!