नागपूर :- नागपूर महानगरपालिकेच्या वतीने “या भारतात बंधुभाव नित्य वसू दे, दे वरचि असा दे” अश्या अनेक स्फूर्ती गीताच्या माध्यमातून देशाला एकात्मतेच्या सुत्रात बांधणारे वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे जयंती निमित्त तुकडोजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन विनम्र अभिवादन करण्यात आले.
या प्रसंगी उपायुक्त प्रकाश वराडे सहा. आयुक्त महेश धामेचा, अति. वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय जोशी, जनसंपर्क अधिकारी मनिष सोनी, अमोल तपासे, कैलाश लांडे, विनोद डोंगरे उपस्थित होते. तसेच मानेवाडा चौकातील वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या पुतळयाला आमदार प्रविण दटके यांनी माल्यार्पण करुन आदरांजली अर्पण केली. या वेळी सहा. आयुक्त नरेंद्र बावणकर व मोठया संख्येने गुरुदेव सेवामंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.