प्रोग्रेसिव्ह मूव्हमेंट तर्फे नामांतर शहीद दिनानिमित्त शहीद भिंमसैनिकाना मानवंदना

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामांतर लढ्यात नागपूरचे विशेष योगदान राहिले. नामांतर आंदोलनात पहिले बलिदानही नागपूरनेच दिले. तो दिवस होता ४ ऑगस्ट १९७८. त्या दिवशी नागपुरातील इंदोरा १० नंबर पूल येथे ५ भीम सैनिक पोलिसांच्या बेछुट गोळीबारात शहीद झाले. त्या दिवसापासून हा दिवस प्रत्येक वर्षी नामांतर शहीद दिवस म्हणून पाळला जातो.त्यानिमित्त कामठी येथील प्रोग्रेसिव्ह मूव्हमेंट तर्फे नामांतर शहीद दिनानिमित्त शहिद झालेल्या भीमसैनिकाना सामूहिक मानवंदना वाहण्यात आली.

याप्रसंगी प्रोग्रेसिव्ह मूव्हमेंट चे पदाधिकारी राजेश गजभिये यांनी सांगितले की महाराष्ट्र विधिमंडळाच्या विधान सभा व विधान परिषद या दोन्ही सभागृहात २७ जुलै १९७८ रोजी मराठवाडा विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव देण्याच्या ठराव एकमताने पारित झाल्यानंतर मराठवाड्यातील दलितांवर हल्ले, जाळपोळ सुरू झाली होती. या अत्याचाराच्या निषेधार्थ पहिल्यांदा आंबेडकरी बालेकिल्ला असलेल्या नागपुरातील जनता रस्त्यावर उतरली होती.

४ आगस्ट १९७८ रोजी आंबेडकरी समाजाचा उत्स्फूर्त मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर निघाला होता. या मोर्चातून परतत असलेल्या नागरिकांवर इंदोरा १० नंबर पूल येथे पोलिसांनी बेछूट गोळीबार केला. त्यात रतन लक्ष्मण मेंढे, किशोर बाळकृष्ण भाकळे, अब्दुल सत्तार बशीर, शब्बीर हुसेन फझल हुसेन हे शहीद झाले, तर गोळीबारात जखमी झालेल्या अविनाश अर्जून डोंगरे या ११ वर्षांच्या कोवळ्या मुलाचा रूग्णालयात मृत्यू झाला. असे ५ लोक नामांतरासाठी शहीद झाले होते. तर पुढच्याच वर्षी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिनी ६ डिसेंबर १९७९रोजी नागपुरात नामांतराच्या अंमलबजावणीच्या मागणीसाठी पुन्हा विशाल मोर्चा काढला होता. त्या वेळीही पोलिसांनी पुन्हा गोळीबार केला. त्यात दिलीप सूर्यभान रामटेके, ज्ञानेश्वर बुधाजी साखरे, रोशन बोरकर व डोमाजी भिकाजी कुत्तरमारे हे ४ भीमसैनिक शहीद झाले नागपुरातील शहिदांसह महाराष्ट्रात ठिकठिकाणी नामांतरासाठी २७ भीमसैनिक शहीद झाले. या शहीद झालेल्या भीमसैनिकांच्या स्मृतिप्रीत्यर्थ इंदोरा १० नंबर पूल येथे उभारलेल्या स्मारकावर सर्व शहीद भीमसैनिकांची नावे कोरलेली आहेत.

तर गीतेश सुखदेवें यांनी सांगितले की नामांतर लढा एक जाज्वल्य इतिहास आहे.नामांतर लढा म्हणजे देशाच्या सामाजिक समतेच्या चळवळीतील सुवर्णाक्षरात नोंदला गेलेला जाज्वल्य इतिहासच आहे. या आंदोलनाच्या उभारणीत आणि यशात नागपूर शहराचे बलिदान मोलाचे आहे. या चळवळीत आत्माहुती देणाऱ्या शहिदांमुळेच नामांतर साकार झाले.

या सर्व शहीद भीमसैनिकाना प्रोग्रेसिव्ह मूव्हमेंट तर्फे सामूहिक मानवंदना वाहण्यात आली.याप्रसंगी राजेश गजभिये, उदास बन्सोड,प्रमोद खोब्रागडे,गीतेश सुखदेवें,विकास रंगारी, दिपणकर गणवीर,अनुप डोंगरे,राजन मेश्राम, सुमित गेडाम, आनंद गेडाम,आशिष मेश्राम,कोमल लेंढारे,अनुभव पाटील, मंगेश खांडेकर, मनोज रंगारी, रायभान गजभिये,कृष्णा पटेल, सलमान भाई आदी उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

लोकाधिकार परिषद निर्णायक भूमिकेवर पोहोचली

Sun Aug 6 , 2023
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- लोकाधिकार परिषदेच्या एका शिष्टमंडळाने आज रामटेक लोकसभा क्षेत्राचे लोकप्रिय खासदार कृपाल तुमाने यांची भेट घेऊन मैत्रेय उद्योग समूहातील गुंतवणूकदार व प्रतिनिधी यांच्या परताव्यासंबंधी सविस्तर चर्चा केली. पल्स या संस्थेच्या गुंतवणूकदार व प्रतिनिधींचे दोन-तीन महिन्यांमध्ये पैसे मिळणार असल्याची माहिती खासदार कृपाल तुमाने यांनी दिली. त्यासाठी त्यांनी प्रयत्न केले असेही म्हणाले. जर मैत्रेयच्या गुंतवणूकदार व प्रतिनिधींना […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com