संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- कामठी तालुक्यातील रणाळा ग्रामपंचायतचे नवनियुक्त सरपंच पंकज साबळे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे व्हेंटिलेटर एम्ब्युलेन्सची मागणी केली होती या मागणीला विदर्भ शिवसेना नेते किरण पांडव यांच्या विशेष सहकार्याने व शिवसेना कार्यकारणी सदस्य शुभम नवले यांच्या पुढाकाराने त्यांच्या प्रयत्नांना यश आलें असून खासदार श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त कामठी तालुकाकरिता रनाळा ग्राम पंचायतीला व्हेंटिलेटर एम्ब्युलेन्स हस्तांतरीत करण्यात आली. व लवकरच येत्या शिवजयंतीला लोकार्पणचा कार्यक्रम घेण्यात येणार आहे.
याप्रसंगी माजी पंचायत समिती उपसभापती विमल साबळे , माजी सरपंच सुवर्ण साबळे, उपसरपंच अंकीता तळेकर, सदस्य प्रदीप सपाटे, अरविंद डोंगरे, स्वप्नील फुकटे, आमिर खान, सुनील चलपे, मयुर गनेर, मंगला ठाकरे, इंदूताई पाटील, स्मिता भोयर, सूनिता नंदेश्वर, अर्चना ठाकरे, रश्मी चौधरी, माजी सदस्य अनिता नवले, अतुल ठाकरे, सिद्धार्थ पाटील, रोशन ठाकरे, हिमांशू लोंधेकर व सर्व ग्राम पंचायत कर्मचारी, गावकरी उपस्थित होते.