निवडणूक खर्चाचे तपशिल नोंदविण्यासाठी प्रशिक्षण

गडचिरोली :- निवडणूक लढविणाऱ्या सर्व उमेदवारांना त्यांचे खर्चाचे लेखे किमान तीन वेळा तपासणी करीता निवडणुक निरीक्षक (खर्च) यांचेकडे सादर करणे आवश्यक आहे. त्यानुषंगाने संबंधीत उमेदवार व त्यांचे प्रतिनिधी यांना खर्च तपशिलाच्या विविध नोंदवहया व प्रमाणके भरण्याबाबत आज प्रशिक्षण देण्यात आले.

निवडणूक निरीक्षक (सामान्य) विनीतकुमार, 67- आरमोरी (अ.ज.) विधानसभा मतदार संघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी मानसी, उपविभागीय अधिकारी रणजीत यादव यावेळी उपस्थित होते.            या प्रशिक्षण कार्यक्रमात निवडणूक विषयक सादर करावयाच्या विविध नोंदवहया व प्रमाणके यांचे नमुने कोणते व कशाप्रकारे भरल्या गेले पाहिजे, याबाबत प्रात्याक्षिकाचे माध्यमातून सहायक खर्च निरीक्षक तथा अप्पर कोषागार अधिकारी दीपक उके, पथक प्रमुख (लेखा) तथा सहायक लेखाधिकारी महेश कोत्तावार यांनी समजावून सांगीतले. तसेच उपस्थित उमेदवार व त्यांचे प्राधिकृत प्रतिनीधी यांनी उपस्थित केलेल्या सर्व प्रश्नांची समर्पक उत्तरे देण्यात आली. 67- आरमोरी (अ.ज.) विधानसभा मतदार संघाअंतर्गत निवडणूक खर्च विषयक तपासणी दिनांक 7, 13 व 19 नोव्हेंबर रोजी नगर परीषद सभागृह देसाईगंज येथे होणार आहे. ठरलेल्या दिनांकास मुळ नोंदवहया व प्रमाणके तपासणीकरीता सादर करणेबाबत निर्देश देण्यात आले. तसेच मुळ नोंदवहया व प्रमाणके सादर न केल्यास निवडणूक आयोगाद्वारे होणारी संभाव्य कार्यवाही, याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

9 व 10 नोव्हेंबर रोजी ग्रामायण प्रतिष्ठानतर्फे अभ्युदय : सेवा कार्याचे निःशुल्क प्रदर्शन

Wed Nov 6 , 2024
– एमएसडब्ल्यूच्या विद्यार्थ्यांना नोकरीची संधी उपलब्ध होणार – चांगल्या कामांना समाजाची साथ! या संकल्पनेवर नागपूरमध्ये पहिल्यांदाच प्रदर्शन नागपूर :- ग्रामायण प्रतिष्ठान सेवा संस्थांना अधिक सशक्त करण्यासाठी सातत्याने विविध उपक्रम राबवत आहे. यावेळी प्रतिष्ठानने एक विशेष उपक्रम आयोजित केला आहे – अभ्युदय: सेवा कार्याचे निःशुल्क प्रदर्शन. “चांगल्या कामांना समाजाची साथ!” या संकल्पनेवर आधारित, नागपूरमध्ये बहुतेक पहिल्यांदाच अशा प्रकारचे प्रदर्शन होत आहे. […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!