यवतमाळ :- जिल्ह्यामध्ये आपले सरकार पोर्टलची प्रभावीपणे अंमलबजावणी व्हावी, पोर्टलवरील प्रलंबित तक्रारींचा शंभर टक्के निपटारा व्हावा यासाठी राज्य शानाच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयात विशेष प्रशिक्षण सत्राचे आयोजन करण्यात आले आहे.
या प्रशिक्षण सत्राचे विशेष संबोधक मुख्य सचिव ऑनलाईन व्हीसीद्वारे सहभागी झाले होते. प्रशिक्षण सत्रात ई-गर्व्हनन्स तज्ञ देवांग दवे व तांत्रिक सहाय्यक विनोद वर्मा यांनी सहभागी कर्मचाऱ्यांना या संदर्भात प्रशिक्षण दिले. सदर विशेष प्रशिक्षण सत्राचे आयोजन दि.११ सप्टेंबर रोजी सकाळी १० ते २ या कालावधीत शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या महसूल भवन सभागृहात पार पडले. यावेळी जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, निवासी उपजिल्हाधिकारी यांच्यासह सर्व विभागाचे विभाग प्रमुख यांची उपस्थिती होती.