संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- नागपूर जिल्ह्याचे उपनगर मानले जाणारे कामठी शहराचा नागपूर पोलीस आयुक्तालयात समावेश झाल्यानंतर पोलिसांची कार्यप्रणाली ला अति वेग आला असून प्रत्येक विभागाशी संबंधित संलग्न कार्यालये करण्यात आली . स्थानिक पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक, वाहतूक पोलीस विभागाचे पोलीस निरीक्षक, सायबर सेल चे पोलीस निरीक्षक असे वेगवेगळे विभागाचे विभाग निरीक्षक वेगळे नेमल्या गेले आहेत.तर नागपूर जबलपूर राष्ट्रीय महामार्ग क्र 7 हा कामठी शहरातील लोकवस्तीतून जात असून या मार्गावरील वाढती वाहतूक वर्दळ सह वाढीव असलेले अपघाती मृत्यू लक्षात घेता माजी पालकमंत्री ना चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पुढाकारातून या मार्गाचे 754 कोटीच्या निधीतून दुपदरी रस्ता बांधकाम करण्यात आले. आज नऊ वर्षांचा काळ लोटून गेला मात्र स्थानिक नगर परिषद प्रशासन तसेच वाहतूक विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षितामुळे या मार्गावरील काढण्यात आलेले वाहतूक सिग्नल पुनःश्च लावण्यात आले नाही. उलट हे ट्राफिक सिग्नल भंगारावस्थेत पडलेले आहेत.
कामठी नागपूर मार्गावर कामठी हुन नागपूर कडे जाणाऱ्या तसेच नागपूर हुन कामठी कडे येणाऱ्या नागरिकाची वाहतूक वर्दळ ही गतीने सुरू आहे. त्यातच नीयमबाह्य पद्धतीने वाहतूक करणारे , तसेच बेशिस्त वाहतुकदारांना लगाम लावण्यासाठी वाहतूक पोलीस काही विशिष्ट चौकात उभे राहून कर्तव्यदक्ष नोकरी बजावत असतात मात्र येथील संवेदनशील चौक असलेले एसबीआय चौक, कामठी कळमना वळण मार्ग हाकी बिल्डिंग चौक, जयस्तंभ चौक, मोटर स्टँड चौक, ड्रॅगन पॅलेस भुयार पुलिया चौक, कमसरी बाजार पुलिया चौक तसेच साई मंदिर चौक पर्यंत अजुनपावेतो एकही वाहतूक सिग्नल लावण्यात आले नाही तसेच ट्राफिक बूथ सुद्धा लावण्यात आले नाही ही एक शोकांतिकाच माणावी लागेल. त्यामुळे वाहतूकदार नाईलाजाने त्रस्त होत असल्याची स्थिती निर्माण झाली असून आज नऊ वर्षांचा काळ लोटून गेला तरी बहुतांश चौकात झेब्रा क्रॉसिंग लावण्यात आले नाही, ट्राफिक सिंगनल लावण्यात आले नाहो, ट्राफिक बूथ सुद्धा लावण्यात आले नाही.मागिल काही महिन्यांपूर्वी जयस्तंभ चौकात दुचाकीने जात असलेल्या एका तरुण व तरुणीचा जागीच अपघाती मृत्यू झाला होता तर धुलिवंदन च्या दिवशी कमसरी बाजार चौकात आलिशा दहाट नामक पाच वर्षोय चिमुकलीचा अपघाती मृत्यू झाला तसेच मागील आठवड्यात नवीन कामठी पोलीस स्टेशन जवळच ट्रक च्या धडकेने एका मुलीचा अपघाती मृत्यू झाला तेव्हा बेशिस्त वाहतूक दारांकडून जेव्हा अश्या निर्दोष वाहतुकदाराचा बळी ची झडी लागेल तेव्हा या वाहतूक व नगर परिषद प्रशासनाला जाग येईल का? असा प्रश्न येथील जागरूक नागरिक करीत आहेत.