तारसा रोड चौकात पोलीस चौकी सुरू करून वाहतुक पोलीस नेमण्यात यावा

संदीप कांबळे,विशेष प्रतिनिधी 

कन्हान : – तारसा रोड चौक येथे असलेलेली पोलीस चौकी चारपदरी सिमेंट महामार्ग निर्माण कामात तोड ण्यात आली. तेव्हा पासुन बनविण्यात न आल्याने या चौकातील वाहतुक पोलीस सुध्दा हटविण्यात आले असल्याने या वर्दळीच्या चौकात वाहन चालक आपली वाहने निष्काळजीने चालवित असल्याने येथे अपघात नेहमी होऊन निर्दोष लोक अपघाताचे बळी पडत आहे . यामुळे त्वरित तारसा रोड चौकात पोलीस चौकी बनवुन वाहतुक पोलीसाची नेमणुक करून दररोज तैनात ठेवण्यात यावा.

ऑटोमेटीव्ह चौक ते टेकाडी बस स्टाप पर्यंत राष्ट्रीय चारपदरी सिमेंट रस्ता बांधकामात कन्हान शहरातील मुख्य तारसा रोड चौकात असलेली पोलीस चौकी तोडण्यात आली. या रस्त्याचे बांधकाम होऊन कित्येक दिवस होऊन सुध्दा चारपदरी सिमेंट रस्ता निर्माण कंपनी व्दारे तोडलेली पोलीस चौकी अद्याप बनविण्यात न आल्याने कन्हान पोलीस स्टेशन च्या वाहतुक पोलीसाची येथे डयुटी लावण्यात येत नाही. कोराना संसर्गाने मागील दोन वर्ष शाळा, महाविद्यालय बंद असुन वाहतुक सुध्दा कमी प्रमाणात होती. परंतु सध्या सर्व पुर्वरत होत रस्त्यानी वाहतुक चांगलीच वाढली आहे.

या चौका जवळच शाळा, विद्यालये व बस स्टाप असल्याने नागपुर, रामटेक ला जाणा-या विद्यार्थ्याची चांगलीच वर्दळ दिवसभर असते. येथे वाहतुक पोलीस राहत नसल्याने वाहने रस्त्यावर कशी ही उभी ठेवतात, बाजाराची स्थाई जागा नसल्याने रस्त्यावरच दुकाने लागुन चारपदरी महामार्ग अरूंद होऊन वाहन चालकाना तारसा रोड चौक ते आंबेडकर चौकातुन आपली वाहने चालविताना तारेवरची कसरत करावी लागत असल्याने दररोज येथे अपघात होत आहे. अशीच परिस्थिती राहल्यास मोठया अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे तारसा रोड चौकात पोलीस चौकी बनवुन नियमित दिवसभर वाहतुक पोलीसाची नेमणुक करण्यात यावी. अशी मागणी परिसरातील नागरिकांच्या चर्चेतुन सामोर येत आहे. यास्तव त्वरित संबधित प्रशासनाने तारसा रोड चौकात पोलीस चौकी बनवुन वाहतुक पोलीसाची नेमणुक करावी. जेणे करून या चौकातील अपघातावर नियंत्रण केल्या जाईल.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

अतिवृष्टी नुकसान आढावा सभा

Fri Jul 22 , 2022
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी कामठी ता प्र 22 :- जिल्हा परिषद सदस्य प्रा.अवंतिकाताई रमेश लेकुरवाळे यांच्या नेतृत्वात मागील १५-२० दिवसापासून सतत सुरू असलेल्या पावसामुळे अनेक गावांना पुराचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांचे तसेच घराचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले. त्या संदर्भात आज समाज भवन तरोडी (बु) येथे आढावा सभा घेण्यात आली. या सभेमध्ये प्रा.अवंतिका रमेश लेकुरवाळे यांनी संबंधित अधिकाऱ्यांनी पावसामुळे नुकसान झालेल्या भागाची […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com