यवतमाळ :- राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिनांक 24 ऑगस्ट रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम खालील प्रमाणे आहे.
शनिवारी दुपारी 12.15 वाजता श्री जवाहरलाल दर्डा हेलिपॅड, भारी येथे आगमन. दुपारी 12.30 वाजता किन्ही येथे आयोजित महिला सशक्तीकरण अभियानांतर्गत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा प्रचार व प्रसार कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी 2 वाजता श्री जवाहरलाल दर्डा हेलिपॅड, भारीकडे प्रयाण. दुपारी 2.15 वाजता हेलिपॅड येथून हेलिकॅाप्टरने अमरावती विमानतळाकडे प्रयाण करतील.