कामठी येथील यश अढाऊ ऐक्सिस राष्ट्रीय स्पर्धेत अव्वल 

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- विश्वेश्वरय्या नेशनल इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नोलॉजी, नागपूर येथे ऐक्सिस द्वारे आयोजित राष्ट्रीय स्पर्धेत कामठी येथील चंद्रमनी नगर येथील रहिवाशी विद्यार्थी यश हर्षवर्धन अढाऊ याने संपूर्ण भारतातून अव्वल क्रमांक पटकावून शहराचे नाव रोशन केले. ही स्पर्धा दरवर्षी घेण्यात येते तसेच या स्पर्धेत पहिल्या फेरीत 1300 विद्यार्थी पूर्ण देशांतून बसले होते, या पैकी पहिली फेरी लेखी परीक्षेची होती. यात 56 विद्यार्थी उत्तीर्ण झाले त्यापैकी मेरिट द्वारे 15 विद्यार्थ्यांना मुलाखत साथी ऐक्सिस द्वारा वी. एन. आय. टि., नागपुर येथे बोलावण्यात आले होते.यात यश अढाऊ याचा अव्वल क्रमांक आला.

यश हा कामठी येथील चंद्रमनी नगर येथील रहिवासी असून भवन्स बी. पी. विद्या मंदिर सिविल लाइंस, नागपूर येथील 7 वी चा विद्यार्थी आहे. या अगोदर सुद्धा यश नि विविध स्पर्धेत यश संपादन केले आहे. या स्पर्धेत देशातील विविध शहरांतील विद्यार्थी होते. विशेष असे की यश हा या मध्ये सर्वात लहान होता. ऐक्सिस संस्था ही विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी शाखेचे महत्व कळावे या उद्देशाने मागील अनेक वर्षांपासून कार्यरत आहे. यश ने आपल्या यशाचे श्रेय त्याचे आजोबा सुरेश अढाऊ आजी निर्मला अढाऊ आई कल्पना हर्षवर्धन अढाऊ आणि परिवारातील इतर सदस्यांना दिले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

1 एप्रिलपासून अनेक नियम बदलले, LPG पासून EPFO पर्यंत तुमच्यावर परिणाम करणारे निर्णय

Mon Apr 1 , 2024
मुंबई :- आज 1 एप्रिल आजपासून नवीन आर्थिक वर्ष सुरु झाले आहे. या नवीन आर्थिक वर्षात काही नियम बदलण्यात आले आहे. तुमच्यावर परिणाम करणारे हे नियम आहेत. या बदलांमध्ये एलपीजी सिलेंडरपासून वाहनांच्या किंमतीपर्यंत बदल झाले आहे. या बदलाचा परिणाम तुमच्या खिशावर होणार आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्पात जाहीर केलेली कर प्रणाली आजपासून लागू होणार आहे. पाहू या काय, काय […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com