आघाडी करण्यासाठी उद्या गोव्यात राष्ट्रवादी व शिवसेनेची बैठक – नवाब मलिक

मुंबई दि. १७ जानेवारी – शिवसेनेसोबत आघाडी करण्यासाठी उद्या गोव्यात राष्ट्रवादीचे नेते प्रफुल पटेल आणि मंत्री जितेंद्र आव्हाड जाणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली.

दरम्यान उद्या शिवसेनेसोबत जी अंतिम चर्चा होईल तो निर्णय गोव्यात प्रफुल पटेल जाहीर करतील अशीही माहिती नवाब मलिक यांनी दिली.

उत्तरप्रदेशमध्ये समाजवादी पक्षासोबत आघाडी झाली आहे. मणीपूरमध्ये कॉंग्रेससोबत आघाडी आहे. गोव्यात स्थानिक पातळीवर कॉंग्रेसने आघाडी न करण्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे शिवसेनेसोबत आघाडी करण्यासाठी चर्चा सुरू आहे असेही नवाब मलिक म्हणाले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

News Today 24x7

Next Post

पवारसाहेबांनी फडणवीसांना याअगोदर 'कात्रजचा घाट' दाखवला होता आता 'काशीचा घाट' दाखवतील - नवाब मलिक

Mon Jan 17 , 2022
मुंबई दि. १७ जानेवारी – पवारसाहेबांवर बोलणार्‍या फडणवीसांना यापूर्वी कात्रजचा घाट दाखवला होता आणि आताही बोलत राहिले तर पवारसाहेब काशीचा घाट दाखवल्याशिवाय राहणार नाही असा स्पष्ट इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस साडेतीन जिल्हयाचा पक्ष बोलणार्‍या देवेंद्र फडणवीस यांना नवाब मलिक यांनी जोरदार फटकारले आहे. पवारसाहेब मुख्यमंत्री असताना फडणवीस कधी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com