भंडारा, दि. 20 : जिल्ह्यातील जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक व तसेच ग्रामपंचायत पोटनिवडणूक करिता या क्षेत्रातील मतदारांना दिनांक 21 डिसेंबर रोजी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सुट्टी जाहीर करण्यात येत आहे. तसेच मतदार मतदानापासून वंचित राहू नये याकरिता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत राज्यातील इतर सर्व आस्थापना व बँका (ज्यांना जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केलेली स्थानिक सुट्टी लागू होत नाही) यांच्या आस्थापनेवरील अधिकारी-कर्मचाऱ्यांना मतदान करता येणे शक्य व्हावे, याकरिता संबंधित आस्थापनांनी कामाच्या तासामधून दोन तासाची सवलत देण्यात यावी, असे आदेश जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी निर्गमित केले आहेत.
मतदानाचा हक्क बजावण्यासाठी उद्या सुट्टी
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com