भारताच्या जैव दृष्टिकोनाची व्याख्या करण्याची ही वेळ – केंद्रीय मंत्री डॉ जितेंद्र सिंह यांचे प्रतिपादन

– ब्रिक आणि तिच्या संस्था सार्वजनिक-खाजगी संशोधन भागीदारीत काम करू शकतात आणि संशोधन उपक्रमांसाठी बिगर शासकीय संसाधनांमार्फत निधीसह देणग्या मिळवू शकतात- डॉ जितेंद्र सिंह

– ब्रिकच्या पहिल्या बैठकीत लोकाभिमुख “झिरो वेस्ट लाइफ ऑन कॅम्पस” उपक्रमाचे डॉ जितेंद्र सिंह यांनी केले उद्घाटन

नवी दिल्ली :- भारताच्या जैव दृष्टिकोनाची व्याख्या करण्याची वेळ आता आली आहे, असे केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्य मंत्री (स्वतंत्र प्रभार) डॉ जितेंद्र सिंह यांनी आज सांगितले. ते ब्रिक सोसायटी अर्थात जैवतंत्रज्ञान संशोधन आणि नाविन्यता परिषद (ब्रिक) संस्थेच्या पहिल्या बैठकीत बोलत होते. केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिल्यानंतर 10 नोव्हेंबर 2023 ला या संस्थेची नोंदणी झाली. जैव तंत्रज्ञानातील संशोधन आणि नवकल्पनांमध्ये भर घालून आरोग्य सुविधा, अन्न आणि ऊर्जा यासारख्या क्षेत्रांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आत्मनिर्भर भारताचे स्वप्न ही नवीन स्वायत्त संस्था पूर्ण करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

अनेक प्रस्थापित आणि मोठ्या संस्था जैवतंत्रज्ञानातील संशोधन आणि विकासासाठी एकत्रित प्रयत्न करत असतानाच ब्रिकची ही बैठक भारताच्या जैवतंत्रज्ञान परिसंस्थेतील ऐतिहासिक घटना असल्याचे ते म्हणाले. अर्थव्यवस्था आणि रोजगारासह प्रत्येक आघाडीवर भारताच्या प्रगतीसाठी ही संस्था काम करेल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. भारतासाठी जैव दृष्टीकोनाची परिभाषा काय असावी याविषयीची मते या बैठकीला उपस्थित असलेल्या जाणकारांकडून जाणून घेऊ इच्छितो, कारण ते या उदात्त मिशनसाठी मोलाचे काम करणार आहेत, असे त्यांनी सांगितले.

ब्रिकने काही महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. ब्रिकमध्ये समाविष्ट केलेल्या 14 संस्थांपैकी प्रत्येक ब्रिक संस्था एका नियामक मंडळाद्वारे शासित वेगळे संशोधन आदेश जारी करतील, असे त्यांनी सांगितले. संस्थात्मक संशोधनातून उदयास येणाऱ्या स्टार्ट-अप्ससाठी संशोधन आणि विकासासाठी थेट लाभ हस्तांतरण (डीबीटी) संस्थांच्या बाहेरील संशोधक आणि त्यांच्या सहकाऱ्यांना (उद्योग किंवा इतर संस्थांमधून) संस्थात्मक प्रयोगशाळेच्या जागेचा वापर करण्याची परवानगी द्यावी मात्र हा वापर एक तृतीयांशपेक्षा जास्त नसावा , असे त्यांनी नमूद केले.

जैव तंत्रज्ञानासाठी प्रादेशिक केंद्रात (आरसीबी) सामायिक अभ्यासक्रमासह ब्रिक संस्थांमधे नवीन पीएचडी कार्यक्रमातील प्रबंध कार्यापूर्वी संशोधन गृहीतके प्रमाणित करण्यासाठी फील्ड किंवा प्रायोगिक अभ्यासासाठी प्रशिक्षण दिले जाईल अशी माहिती त्यांनी दिली.

डॉ जितेंद्र सिंह यांनी यावेळी ‘झिरो वेस्ट लाइफ ऑन कॅम्पस’ कार्यक्रमाचे उद्घाटन केले.

‘झिरो वेस्ट लाइफ ऑन कॅम्पस’ कार्यक्रमाचा उद्देश प्रत्येक ब्रिक संकुलात ज्ञान आणि तंत्रज्ञानाचा वापर आणि अवलंब करून सह व्यवस्थापन मॉडेल्सना चालना देऊन शाश्वतता गाठणे हा आहे. विविध ठिकाणी असलेल्या, भिन्न संस्कृतीच्या आणि वेगळी हवामान परिस्थिती असलेल्या 13 ब्रिक संस्था परिसरात तंत्रज्ञान आणि तंत्रांच्या पुनर्वापराचे फायदे आणि आव्हाने समजून घेण्याची संधी त्यामुळे मिळणार आहे. हा कार्यक्रम सामूहिक एकात्मिक कचरा व्यवस्थापनाच्या संशोधनाला एक नवीन दिशा देईल.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

एयर मार्शल प्रवीण केशव वोहरा ने भारतीय वायुसेना के पश्चिमी वायु कमान के वरिष्ठ एयर स्टाफ अधिकारी का पदभार संभाला

Sat Dec 2 , 2023
नई दिल्ली :-एयर मार्शल प्रवीण केशव वोहरा ने 01 दिसंबर 2023 को भारतीय वायु सेना के पश्चिमी वायु कमान के वरिष्ठ वायु कर्मचारी अधिकारी (एसएएसओ) के रूप में पदभार संभाल लिया है । एयर मार्शल राष्ट्रीय रक्षा अकादमी (नेशनल डिफेन्स अकैडमी-एनडीए) के पूर्व छात्र हैं और उन्हें 19 दिसंबर 1987 को भारतीय वायु सेना में लड़ाकू पायलट के रूप में […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com