योग्य मार्गदर्शनाने वेळेची बचत, जनसामान्यांना दिलासा, प्रादेशिक परिवहन कार्यालयात जनसंपर्क कक्ष

नागपूर :-आयुष्याची परीक्षा असो की विद्यापीठाची योग्य मार्गदर्शन मिळाल्यास निकाल चांगलाच मिळतो. एका चुकीच्या निर्णयाने किंवा मार्गदर्शनाने संपूर्ण आयुष्याचे गणित बिघडते. दैनंदिन कामाचेही तसेच आहे. शासकीय कार्यालयात मार्गदर्शनाअभावी नागरिकांना भटकावे लागते, वेळ वाया जातो. शेवटी दलालांची मदत घ्यावी लागते. जनसामान्यांचा विचार करून प्रादेशिक परिवहन कार्यालय, सिव्हिल लाईन्स येथे जनसंपर्क कक्ष सुरू करण्यात आला.

अलिकडे शासकीय कार्यालयात जनसामान्यांशी संबंधित कामकाज आभासी पद्धतीने होत आहे. घरबसल्याही बरीच कामे करता येतात मात्र काही कामांसाठी कार्यालयात जावेच लागते. विशेष म्हणजे आजही बहुतांश लोक ऑनलाईन कामे करीत नाहीत. त्यामुळे शासकीय कामकाजासंबंधी थेट कार्यालयात जाणार्‍यांची संख्या भरपूर आहे. यातील बहुतांश लोकांना पहिल्यांदाच जाण्याचा प्रसंग असतो. त्यामुळे काय करावे, कुठे जावे, कोणाशी संपर्क साधवा, कागदपत्र आणि प्रकिया याची माहिती नसल्याने आणि अधिकृतपणे कोणी सांगत नसल्याने जनसामान्यांची गोची होते. पर्याय नसल्याने दलालांशी संपर्क साधतात. त्यात काहींची फसवणूक होते. या सर्व बाबींना आळा घालण्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालय, सिव्हिल लाईन्स येथील इमारतीच्या तळमजल्यावर जनसंपर्क कक्ष स्थापन करण्यात आला आहे. सामान्य जनतेला मार्गदर्शन करण्यासाठी या कार्यालयातील निवनियुक्त परिविक्षाधीन सहायक मोटार वाहन निरीक्षक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यात आकाश दखणे, राहुल वंजारी, व्यंकटेश्वर सिंदम, कुणाल कुथे आणि स्नेहल पाराशर यांचा समावेश आहे. प्रत्येक निरीक्षकांसाठी एक दिवस ठरविण्यात आला आहे. सोमवार ते शुक्रवार असा त्याचा क्रम आहे.

सामान्य जनतेला मार्गदर्शन

अनुज्ञप्तीधारक व वाहनधारक कार्यालयात आल्यानंतर त्यांना ज्या विभागाशी संबंधित कामकाज आहे, त्या विभागातील कामासंबंधी आवश्यक असलेली कागदपत्रे व कार्यालयातील कामकाजाकरिता संबंधितास संपर्क करण्यासाठी व मार्गदर्शन करण्यासाठी जनसंपर्क कक्ष स्थापन करण्यात आला आहे, असे प्रादेशिक परिवहन अधिकारी रवींद्र भुयार यांनी सांगितले.

 

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

स्वच्छ भारत अभियान : प्लास्टिक विरुध्द मनपाची कारवाई

Wed Nov 16 , 2022
नागपूर :- स्वच्छ भारत अभियान अंतर्गत नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने मंगळवारी (ता.15) 5 प्रतिष्ठानांवर कारवाई करून 31 हजार रुपयांचा दंड वसूल केला. मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांच्या मार्गदर्शनात गांधीबाग झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे प्रतिबंधित प्लास्टिक पिशवी संदर्भात 2 प्रतिष्ठानांवर कारवाई करून 10,000/- रुपयांचा दंड वसूल करण्यात आला तसेच 220 किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले.उपद्रव शोध पथकाने प्लास्टिक […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com