नागपूर :-उत्तर नागपूरच्या सुगत नगरातील चंदा विजय मेश्राम हिचे चैतन्य नगरातील रारध उच्च प्राथमिक शाळा येथील बुथ क्रमांक 37 च्या अनुक्रमांक 678 वर नाव नोंदवले होते. तसेच सुगत नगरातील मियाको इंग्लिश शाळेत सुद्धा बूथ क्रमांक 162 च्या अनुक्रमांक 447 वरही तिचे नाव नोंदवले होते. आज दुपारी ती मतदान करायला आपले इलेक्शन कार्ड व आधार कार्ड घेऊन गेली तर या दोन्ही ठिकाणी तिच्या नावाने पूर्वीच मतदान झाल्याचे निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे तिने बसपाचे माजी नगरसेवक व पक्षनेते गौतम पाटील यांच्या पुढाकाराने सुगत नगरातील नियाको शाळेतील बुथ क्रमांक 162 निवडणुक अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असतात त्यांनी मतदान झाल्याचे सांगितले. त्यामुळे गौतम पाटील यांनी त्या दोन्ही ठिकाणचे व्यक्ती हे बोगस असून अधिकृत मतदार ही असल्याने व हिच्याकडे मूळ निवडणूक कार्ड व आधार कार्ड असल्याने हिला मतदानापासून वंचित ठेवता येणार नाही असे झाल्यास निवडणूक आयोगाकडे तक्रार केल्या जाईल अशी धमकी दिली.
त्यामुळे निवडणूक अधिकाऱ्यांनी बॅलट क्र 01342 ने मतदान करण्याची संधी दिली. प्रश्न हा आहे की चंदा विजय मेश्राम या नावाच्या आणखी दोन महिला कोण? आणि त्यांच्याकडे हेच निवडणूक कार्ड? व हाच आधार नंबर कसा? असा प्रश्न बसपा नेते उत्तम शेवडे यांनी विचारून त्याची सखोल चौकशी करण्याची मागणी केली.